TRENDING:

Pakistan Train Hijack: आधी बॉम्बर्सला उडवलं, मग..., पाकिस्तान आर्मीने बंडखोरांच्या तावडीतून 400 जणांना कसं सोडवलं?

Last Updated:

Pakistan Train Hijack : पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे की त्यांनी ट्रेन अपहरण करणाऱ्या सर्व 33 दहशतवाद्यांना ठार मारले आहे आणि अपहरणकर्त्यांची यशस्वीरित्या सुटका केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली: पाकिस्तानमधील ट्रेन हायजॅक प्रकरणावर पाकिस्तानी लष्कर आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे आपापले दावे आहेत. पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे की त्यांनी ट्रेन अपहरण करणाऱ्या सर्व 33 दहशतवाद्यांना ठार मारले आहे आणि अपहरणकर्त्यांची यशस्वीरित्या सुटका केली आहे. तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा दावा आहे की 154 ओलिस अजूनही त्यांच्या ताब्यात आहेत. दरम्यान, सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पाकिस्तानी सैन्याने ही कारवाई कशी केली?
News18
News18
advertisement

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी दुनिया न्यूजला दिलेल्या मुलाखतीत लष्कर, हवाई दल, फ्रंटियर कॉर्प्स आणि स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप कमांडोसह सुरक्षा दलांनी संयुक्तपणे ही रिस्की मोहीम कशी पार पाडली, याचं वर्णन केले. ते म्हणाले, “बचाव कार्य तत्काळ सुरू करण्यात आले. परंतु बीएलएचे दहशतवादी सॅटेलाइट फोनद्वारे अफगाणिस्तानातील त्यांच्या हँडलर्स आणि कमांडर्सच्या संपर्कात असल्याने अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक होते.

advertisement

सैन्याने ऑपरेशन कसे केले?

ट्रेनमधून महिला आणि लहान मुलही प्रवास करत होते, त्यामुळे सुरक्षा दलांना अतिशय सावधगिरीने पुढे जावे लागले. सर्वप्रथम, लष्कराच्या स्नायपर्सनी आत्मघातकी हल्लेखोरांना मारले. जेणेकरून त्यांचं जॅकेट फुटू शकणार नाहीत. कारण जर त्यांनी स्वतःला बॉम्बने उडवलं असतं, तर यात इतरही लोक मृत्युमुखी पडले असते. यानंतर, सुरक्षा दलांनी एक-एक करून सर्व डबे रिकामे केले आणि कोणत्याही ओलिसांना इजा न करता सर्व दहशतवाद्यांना ठार मारले.

advertisement

मोठा स्फोट आणि मग गोळीबार झाला

शरीफ यांनी दुनिया न्यूजला सांगितले की, ही कारवाई अत्यंत अचूकतेने आणि सावधगिरीने करण्यात आली. दहशतवादी प्रवाशांचा मानवी ढाल म्हणून वापर करत असल्याने, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत त्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी लागली. हल्ल्यातील वाचलेल्यांनी हिंसाचाराच्या भयानक दृश्यांची आठवण केली. सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांपैकी एक मुश्ताक मुहम्मद यांनी बीबीसी उर्दूला सांगितले की, "एक मोठा स्फोट झाला आणि गोळीबार झाला... ते असे दृश्य होते जे कधीही विसरता येणार नाही."

advertisement

ओलिसांनी काय म्हटले?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

पत्नी आणि दोन मुलांसह प्रवास करणाऱ्या इशाक नूर या एका प्रवाशाने सांगितले की, पहिल्या स्फोटाने ट्रेन प्रचंड हादरली, यात माझा मुलगा सीटवरून खाली पडला. यानंतर जेव्हा अंदाधुंद गोळीबार सुरू झाला तेव्हा मी माझ्या एका मुलाला माझ्याखाली ओढले तर माझ्या पत्नीने आमच्या दुसऱ्या मुलासोबतही असेच केले. जर गोळी आम्हाला लागली असती तर निदान आमची मुलं तरी वाचली असती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दहशतवाद्यांनी आधी ओळखपत्रे तपासली आणि काही लोकांना वेगळे केले. मुश्ताक म्हणाला, “आमच्या डब्याच्या दारावर तीन दहशतवादी पहारा देत होते. त्यांनी आम्हाला सांगितले की ते नागरिक, महिला, वृद्ध किंवा बलुच प्रवाशांना इजा करणार नाहीत.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Pakistan Train Hijack: आधी बॉम्बर्सला उडवलं, मग..., पाकिस्तान आर्मीने बंडखोरांच्या तावडीतून 400 जणांना कसं सोडवलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल