TRENDING:

रात्री गुपचूप विवाहित प्रेयसीच्या खोलीत घुसला पोलीस; पण दिराने पाहिलं अन् मिळाली आयुष्यभराची शिक्षा

Last Updated:

घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर एसएसपींनी कॉन्स्टेबलला निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ : प्रेमाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे. यात डायल 112 च्या पोलीस कॉन्स्टेबलचे एका विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. रात्रीच्या अंधारात सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस कॉन्स्टेबल महिलेच्या घरात घुसला. मात्र, कुटुंबीयांना हे समजलं. मग त्यांना आरडाओरड सुरू केली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर एसएसपींनी कॉन्स्टेबलला निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून समोर आली आहे.
प्रेयसीसोबत होता पोलीस (प्रतिकात्मक फोटो)
प्रेयसीसोबत होता पोलीस (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची काही दिवसांपूर्वी डायल 112 चे कॉन्स्टेबल केसरीनंदन यांच्याशी भेट झाली होती. पुढच्या वेळी काही दिवसांनी ते पुन्हा भेटले तेव्हा त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. त्यानंतर बोलणं सुरू झालं. संवादामुळे त्यांची जवळीक वाढली, पण कुणालाच त्याची माहिती नव्हती. अचानक एके दिवशी महिलेचा तिच्या दिराशी वाद झाला. आपल्या दिराला धडा शिकवण्यासाठी तिने तिच्या प्रियकराला म्हणजेच पोलीस कर्मचाऱ्याला बोलावलं आणि दिराला अटक झाली.

advertisement

मुंबईने दाखवली मोठी स्वप्न अन् ट्रेनमध्ये बसली 3 अल्पवयीन मुलं; GRP ने अडवताच हैराण करणारा खुलासा

दीर पोलीस ठाण्यात गेला तेव्हा त्याच्या मनात एक शंका आली, की आपल्या वहिनीचे पोलिसाशी काहीतरी चुकीचे संबंध असावेत. लॉकअपमधून बाहेर आल्यानंतर तो आपल्या वहिनीवर लक्ष ठेवू लागला. काल रात्री अचानक हाच कॉन्स्टेबल सिव्हिल ड्रेसमध्ये महिलेच्या खोलीत घुसला. हे पाहताच दिराने दार लावून बाहेर आरडाओरडा करायला सुरुवात केली. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून पोलिसाला पकडलं आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आपला जीव वाचवणं अवघड आहे असं कॉन्स्टेबलला वाटल्याने त्याने आपली ओळख जाहीरपणे सांगितली. त्यानंतरही गावकऱ्यांनी त्याला खूप मारहाण केली.

advertisement

ही बाब निदर्शनास येताच एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर यांनी केसरीनंदनला तत्काळ निलंबित केलं. तसेच विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

मराठी बातम्या/क्राइम/
रात्री गुपचूप विवाहित प्रेयसीच्या खोलीत घुसला पोलीस; पण दिराने पाहिलं अन् मिळाली आयुष्यभराची शिक्षा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल