काही मिनिटं थांबल्यावर मॅडमची बॅग आली आणि ती अरायव्हल टर्मिनलच्या एक्झिट गेटकडे निघाली. मॅडमला कल्पना नव्हती, पण कस्टम प्रिव्हेंटिव्ह टीमने तिच्यावर लक्ष ठेवलं होतं. प्रोफाइलिंगवरून या महिलेमध्ये नक्कीच काहीतरी गडबड असल्याचा अंदाज प्रिव्हेंटिव्ह अधिकाऱ्यांना आला होता. ते ही महिला ग्रीन किंवा रेड चॅनलवरून जाण्याची वाट पाहत होते. कस्टम ऑफिसर्सच्या अपेक्षप्रमाणे तिने टर्मिनलमधून जाण्यासाठी ग्रीन चॅनलच निवडला.
advertisement
या महिलेनं चेहऱ्यावर काहीही हावभाव न आणता आणि स्ट्रेट पोश्चरमध्ये ग्रीन चॅनल पार केला. तिने एक्झिट गेट ओलांडण्याआधीच मागे उभ्या असलेल्या कस्टम अधिकाऱ्यांनी एक्झिट गेटवर उभ्या असलेल्या प्रिव्हेंटिव्ह पथकाला इशारा केला. प्रिव्हेंटिव्ह पथकाने या महिलेला थांबवून विचारलं - मॅडम! तुमच्याकडे ड्युटी पे करण्यासारखी काही वस्तू आहे का? ज्या अतिआत्मविश्वासाने महिलेनं नकारार्थी मान हलवली त्यामुळे कस्टम ऑफिसच्या संशयाला पुष्टी मिळाली. यानंतर तपासणी कऱण्यासाठी महिलेला बाजूला नेण्यात आलं.
Crime News : आई कामावर गेली, अडीच वर्षांची चिमुकली रडू लागताच बापाने गाठला क्रूरतेचा कळस
महिलेच्या बॅगची आधी झडती घेतली, पण त्यात काहीच सापडलं नाही. यानंतर महिलेची तपासणी करण्यात आली. झडतीदरम्यान तिच्या कपड्यातून काहीतरी बाहेर आलं, ज्यामुळे सर्वच चकित झाले. खरंतर महिलेनं तिच्या अंडरगारमेंटमध्ये चार सोन्याच्या बांगड्या लपवल्या होत्या. या बांगड्यांचं वजन सुमारे 810 ग्रॅम असल्याचं आढळून आलं, ज्याची भारतीय बाजारपेठेत किंमत अंदाजे 54.29 लाख रुपये आहे.
सीमाशुल्क विभागाच्या अतिरिक्त आयुक्त मयुषा गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमान AI-916 ने IGI विमानतळावर पोहोचलेल्या या महिला प्रवाशाला सीमा शुल्क कायद्याच्या कलम 104 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोन्याच्या बांगड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.
