TRENDING:

405 दिवस, 10 देश, 41 लाखांचा खर्च... ध्येयापर्यंत पोहोचला, पण शेवटी नशीब फुटकं निघालं अन् स्वप्न भंगलं...

Last Updated:

पंजाबच्या मनिंदर पाल सिंगने अमेरिकेचे स्वप्न पाहून 10 देश पायी पार केले आणि 41 लाख रुपये खर्च केले. मात्र, अमेरिकेत पोहोचताच सुरक्षा यंत्रणांनी त्याला अटक केली. 2 महिने डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवल्यानंतर त्याला...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आपलं ध्येय गाठण्यासाठी त्याची इच्छा इतकी तीव्र होती की, तो सतत चालत 10 देशांच्या सीमा ओलांडून गेला. या व्यक्तीने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकूण 41 लाख रुपये खर्च केले. पण, त्याला हे जराही माहीत नव्हतं की, ध्येय गाठताच त्याचं नशीब फिरणार आणि असं काही घडणार, ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल. इतकंच नाही, त्याचे पैसे आणि स्वप्न एकाच वेळी पाण्यात जाणार होते.
AI Image
AI Image
advertisement

दिल्लीहून कझाकिस्तानला गेला...

हो, ही कहाणी आहे 20 वर्षीय मनिंदर पाल सिंगची, जो जालंधर (पंजाब) मधील पट्टी मालशियनमध्ये राहतो. मनिंदर पाल सिंगचंही अमेरिकेत जाऊन नवीन आयुष्य सुरू करण्याचं स्वप्न होतं. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनिंदरने ऑक्टोबर 2023 मध्ये प्रवास सुरू केला. सर्वप्रथम तो दिल्लीहून कझाकिस्तानला पोहोचला. कझाकिस्तानमध्ये काही दिवस राहिल्यानंतर तो दुबईला निघाला.

advertisement

दुबईमधून पुढे लिबियाला गेला...

दुबईहून त्याला लिबियाला पाठवण्यात आलं आणि नंतर लिबियाहून तो सेनेगलला पोहोचला. यानंतर, तो लिबिया, निकाराग्वा, होंडुरास, ग्वाटेमाला मार्गे मेक्सिकोला पोहोचण्यात यशस्वी झाला. मनिंदरला या देशांच्या सीमा ओलांडण्यासाठी सुमारे 13 महिने लागले. ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेला मनिंदरचा अमेरिकेचा प्रवास नोव्हेंबर 2024 मध्ये मेक्सिकोमार्गे अमेरिकेत पोहोचून संपला.

advertisement

एजंटच्या सुचनेवरून पासपोर्टची पानं फाडली

अमेरिकेत पोहोचताच मनिंदरने त्याच्या एजंटच्या सूचनेनुसार, विविध देशांचे बनावट व्हिसा असलेले पासपोर्टचे सर्व पानं फाडून टाकली. यानंतर, मनिंदरचं दुर्दैव त्याला अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सींकडे घेऊन गेलं. त्यानंतर, अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सीने मनिंदरला अटक करून डिटेंशन सेंटरमध्ये पाठवलं. सुमारे दोन महिने डिटेंशन सेंटरमध्ये ठेवल्यानंतर त्याला दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर परत पाठवण्यात आलं.

advertisement

आरोपी होऊन पुन्हा भारतातच आला...

आयजीआय विमानतळाच्या डीसीपी उषा रंगनानी यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेला आरोपी मनिंदर पाल सिंगला भारतीय दंड संहितेच्या कलम 318(4)/319(2)/336(3)/340(2)/238(C) आणि पासपोर्ट कायद्याच्या कलम 12 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसएचओ सुनील गोयल यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली. मनिंदरने दिलेल्या माहितीवरून अमित अरोरा नावाच्या आणखी एका आरोपीला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे.

advertisement

हे ही वाचा : 'माझ्या लग्नाला नक्की या', लग्नपत्रिकेची PDF उघडली अन् बँक खातं झालं रिकामं! कशी झाली फसवणूक? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

हे ही वाचा : तुमचीही ऑनलाईन फसवणूक झालीय? तातडीने करा 'हे' महत्त्वाचं काम, गेलेले पैसे मिळतील परत!

मराठी बातम्या/क्राइम/
405 दिवस, 10 देश, 41 लाखांचा खर्च... ध्येयापर्यंत पोहोचला, पण शेवटी नशीब फुटकं निघालं अन् स्वप्न भंगलं...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल