advertisement

'माझ्या लग्नाला नक्की या', लग्नपत्रिकेची PDF उघडली अन् बँक खातं झालं रिकामं! कशी झाली फसवणूक? 

Last Updated:

गुजरातच्या राजकोटमध्ये सायबर गुन्हेगारांनी लग्नाच्या आमंत्रणाच्या नावाखाली मोठी फसवणूक केली. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले PDF डाऊनलोड करताच मोबाईल हॅक झाला आणि खात्यातून हजारो रुपये गायब झाले. अशा प्रकाराने अनेक लोकांचे...

News18
News18
तुमच्या नातेवाईकाने तुम्हाला लग्नाचं आमंत्रण पाठवलं आणि तुम्ही आनंदानं ते उघडलं, पण आनंद साजरा करण्याऐवजी तुमच्या बँक खात्यातून हजारो रुपये गायब झाले तर... भीतीदायक आहे ना? असंच काहीसं गुजरातच्या राजकोट जिल्ह्यात अनेक लोकांसोबत घडलं आहे.
लग्नपत्रिकेतच लपलेला सायबर सापळा!
राजकोट जिल्ह्यातील कोलिथड गावातील रियाझ भाई गाला यांची गोष्ट ऐका. 14 फेब्रुवारीला त्यांना त्यांच्या नातेवाईक ईशान भाई यांचा फोनवर मेसेज आला. म्हणाले, “माझ्या लग्नाला नक्की या.” त्यासोबत एक PDF फाईलही होती. रियाझ भाईंना आनंद झाला, त्यांनी विचार केला लग्नाचं कार्ड पाहूया, पण हे कार्ड खरं तर सायबर ठगांनी रचलेला सापळा होता. त्यांनी फाईल डाउनलोड करताच, हॅकर्सनी त्यांच्या फोनचा ताबा घेतला. आधी फक्त 1 रुपया कापला गेला, मग हळूहळू पूर्ण 75,000 रुपये गायब झाले. त्यांना काही कळायच्या आत, त्यांच्या कष्टाचे पैसे दुसऱ्याच्या खिशात गेले होते.
advertisement
शेतीत राबणारेही ठरले बळी!
रियाझ भाई एकटे नव्हते. कोलिथड गावातील शेतकरी शैलेश भाई सावळिया यांच्यासोबतही असंच घडलं. दिवसभर शेतात राबणाऱ्या शैलेश भाईंनाही असंच लग्नाचं आमंत्रण आलं. त्यांनीही कोणताही संशय न घेता फाईल डाउनलोड केली आणि काही क्षणात त्यांच्या खात्यातून 24,000 रुपये गायब झाले.
आता तुम्हाला वाटत असेल की, हे फक्त एका गावापुरतं आहे. नाही भाऊ! राजकोटच्या वेजागम गावात एकाच वेळी 10 लोकांचे फोन हॅक झाले. गावचे सरपंच जीतू भाई यांचा फोन आधी हॅक झाला आणि नंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचे फोनही हॅक झाले. बरं झालं त्यांनी लगेच बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खाती बंद केली, नाहीतर तिथेही लाखो रुपयांचं नुकसान झालं असतं.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'माझ्या लग्नाला नक्की या', लग्नपत्रिकेची PDF उघडली अन् बँक खातं झालं रिकामं! कशी झाली फसवणूक? 
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement