तुमचीही ऑनलाईन फसवणूक झालीय? तातडीने करा 'हे' महत्त्वाचं काम, गेलेले पैसे मिळतील परत!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
बिहारसह संपूर्ण भारतात सायबर फसवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. 'सायबर अटक'सारख्या बनावट क्लृप्त्यांपासून सावध रहा, अन्यथा...
संपूर्ण भारतात डिजिटल फसवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दररोज असे प्रकार समोर येत आहेत, ज्यात लोकांची पैशांची फसवणूक होत आहे, शिक्षित लोकंही या फसवणुकीला बळी पडत आहेत. थोड्याशा लोभामुळे त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. ऑनलाईन फसवणूक करणारे विविध पद्धती वापरून लोकांची फसवणूक करत आहेत. तुम्हीही सायबर फसवणुकीला बळी पडला असाल आणि तुमचे पैसे गेले असतील, तर ते पैसे परत मिळवण्यासाठी काय करावं, हे जाणून घ्या...
सायबर डीएसपींनी दिली माहिती
बिहारच्या जेहानाबाद सायबर डीएसपी रेणू कुमारी यांनी लोकल 18 ला सांगितलं की, आजकाल इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर वाढलं आहे, त्यामुळे आपण आपली सर्व माहिती शेअर करतो. यात बँक खात्याच्या तपशीलांचाही समावेश आहे. सायबर गुन्हेगार याचा फायदा घेऊन वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करत आहेत. ते तुम्हाला वेगवेगळ्या लिंक्स पाठवून किंवा डिजिटल अरेस्ट करून फसवतात. याशिवाय, इतर अनेक प्रकारे डिजिटल फसवणूक केली जात आहे.
advertisement
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? ती कशी टाळावी?
जेहानाबाद सायबर डीएसपी म्हणाल्या की, आजकाल डिजिटल अरेस्टचा ट्रेंड सुरू आहे. यामध्ये, सायबर गुन्हेगार सीबीआय अधिकारी किंवा पोलीस किंवा न्यायाधीश असल्याचं नाटक करून व्हिडीओ कॉल करतो आणि योग्य गणवेशात समोर बसतो. तो म्हणतो की, तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आणि तुमचं नाव काढण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. या दरम्यान, तो तुम्हाला एकटं पाडतो म्हणजेच डिजिटल अरेस्ट करतो आणि पैसे ट्रान्सफर करून घेतो. याबाबत डीएसपी म्हणाल्या की, डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. पोलीस कधीही कोणाला डिजिटल अरेस्ट करत नाहीत. यात दाखवलेलं अटक वॉरंटही बनावट असतं.
advertisement
तात्काळ तक्रार केल्यास पैसे परत मिळू शकतात
सायबर डीएसपी पुढे म्हणाल्या की, तुम्ही सायबर फसवणुकीला बळी पडल्यास, तुम्ही 1930 वर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. याशिवाय, तुम्ही www.cybercrime.gov.in वर ऑनलाईन तक्रारही नोंदवू शकता. सायबर फसवणुकीला बळी पडल्यानंतर तुम्ही जितकी लवकर तक्रार कराल, तितक्या लवकर तुमचे पैसे थांबवले जातील आणि खातंही गोठवलं जाईल. यामुळे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. उशीर झाल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता कमी होते. तुम्ही फसवणुकीला बळी पडल्यास, जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीस ठाण्यात जाऊनही तक्रार नोंदवू शकता.
advertisement
हे ही वाचा : 'माझ्या लग्नाला नक्की या', लग्नपत्रिकेची PDF उघडली अन् बँक खातं झालं रिकामं! कशी झाली फसवणूक?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 22, 2025 4:43 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
तुमचीही ऑनलाईन फसवणूक झालीय? तातडीने करा 'हे' महत्त्वाचं काम, गेलेले पैसे मिळतील परत!


