TRENDING:

कुराण जाळलं, टिकटॉकवर लाईव्ह स्ट्रिम अन् हत्येचा थरार, सलवान मोमिका कोण?

Last Updated:

स्वीडनमध्ये कुराण जाळल्याने चर्चेत असलेल्या सलवान मोमिकाची हत्या झाली. त्यांचा मृतदेह स्टॉकहोमजवळ आढळला. मोमिकाच्या हत्येचं टिकटॉकवर लाईव्ह स्ट्रिमिंगही करण्यात आलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ मानला जाणारं कुराण जाळल्याने चर्चेत असलेल्या सलवान मोमिकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे मोमिकाच्या हत्येचं टिकटॉकवर लाईव्ह स्ट्रिमिंगही करण्यात आलं. कुराणच्या अनेक प्रती जाळणारा इराकी नागरिक सलवान मोमिकाचा स्वीडनमध्ये मृतदेह आढळला. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, 29 जानेवारी रोजी स्टॉकहोमजवळ मोमिकाचा मृतदेह आढळला. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
कुराण जाळणारा सलवान मोमिका कोण? स्वीडनमध्ये आढळला मृतदेह
कुराण जाळणारा सलवान मोमिका कोण? स्वीडनमध्ये आढळला मृतदेह
advertisement

स्टॉकहोम जिल्हा न्यायालयाने सांगितले की मोमिकाविरुद्धच्या खटल्यात निकाल जाहीर करायचा होता, जो आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आला. न्यायालयाचे न्यायाधीश गोरान लुंडाहल यांनी मोमिकचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मोमिकचा मृत्यू कसा झाला याबाबत मात्र त्यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही.

2023 मध्ये जाळलं होतं कुराण

2023 मध्ये ईदच्या निमित्ताने स्वीडनची राजधानी स्टॉकहोममधील सर्वात मोठ्या मशिदीसमोर मुस्लीम धार्मिक ग्रंथ कुराणच्या प्रती जाळल्याने तो चर्चेत आला होता. त्याच्या या वागण्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. मोमिकाचा कुराण जाळण्याचा चिथावणीखोर व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे अनेक मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या आणि देशात संपाताची लाट उसळली. या व्हिडीओमुळे खळबळ तर उडालीच पण टीकाही सुरू झाली. काही ठिकाणी तणाव आणि दंगलीचं वातावरण त्यावेळी झालं होतं.

advertisement

2023 च्या निदर्शनांदरम्यानच्या कृत्यांनंतर वांशिक द्वेष भडकवल्याबद्दल दोषी ठरलेल्या इराकी ख्रिश्चन आणि नास्तिक मोमिका यांना दोषी ठरवणार होते की नाही यावर निर्णय देणार होते. मोमिकाच्या मृत्यूमुळे न्यायालयीन सुनावणी ३० जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

कोण आहे मोमिका?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

मोमिकाने स्वतःला इराकमधील ख्रिश्चन मिलिशियाचा प्रमुख म्हणून सादर केले होते. त्यांची संघटना इमाम अली ब्रिगेड्स अंतर्गत येते. ही संघटना २०१४ मध्ये स्थापन झाली आणि तिच्यावर युद्ध गुन्ह्यांचा आरोप आहे. 2917 मध्ये इराकी शहर मोसुलच्या बाहेरील भागात सलवान मोमिका याने स्वतःचा सशस्त्र गटही स्थापन केला.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
कुराण जाळलं, टिकटॉकवर लाईव्ह स्ट्रिम अन् हत्येचा थरार, सलवान मोमिका कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल