TRENDING:

Gadchiroli Crime news : रक्षाबंधनदिवशी गडचिरोलीत धक्कादायक घटना, तरुणीचे कपडे फाडून बेदम मारहाण

Last Updated:

Gadchiroli Crime news : मोबाईल चार्जिंकवरुन वाद, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे कपडे फाडून बेदम मारहाण

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
महेश तिवारी, प्रतिनिधी गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला 2 जणांनी मोबाईल चार्जिंगच्या कारणावरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाला इतकी भयंकर मारहाण करण्यात आली होती की ती तरुणी बेशुद्ध पडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

ही धक्कादायक घटना आरमोरी-येथील वडसा टी. पॉईंटजवळ एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या तरुणीसोबत घडली. दोन आरोपींनी विनाकारण अश्लील शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. यांच्यात मोबाईल चार्जिंगला लावण्यावरुन वाद झाला आणि त्यातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं.

मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसापूर्वी आरोपी सोहेल आणि त्याची पत्नी सदर रेस्टॉरंटमध्ये डोसा खाण्यासाठी आले. आरोपी सोहेल पत्नीला रेस्टॉरंटमध्ये बाहेर गेल्यानंतर सोहेलच्या पत्नीने हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीसोबत मोबाईलच्या चार्जर वरून बाचाबाची केली. त्यानंतर पत्नीने आपल्या पतीला फोन करून या वादाची माहिती दिली.

advertisement

आरोपी सोहेलने हॉटेलमध्ये येताच काउंटरवर बसलेल्या युवतीचे केस धरून काउंटर मधून बाहेर ओढून रेस्टॉरंट मध्ये असलेल्या टेबलवर तिचे जोरजोराने डोके आपटले.यानंतर आरोपी सोहेलने एवढ्यावरच न राहता तिचे केस धरून फरफटत नेले. तिच्या अंगावरील कपडे पकडून तिला खाली पाडले. तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

वारंवार हॉटेल मालकाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मालकाला न जुमानता आरोपी सोहेल मात्र तिला लाता बुक्क्यांनी मारतच होता. पीडित तरुणी बेशुद्ध पडली. दरम्यान दुसरा आरोपी अयुब पठाण याने तर तिला बेशुद्ध पडल्यानंतर मारहाण केली. हॉटेल मालकाने तिला आणखी मारू नये म्हणून समयसूचकता दर्शवून तिला मागील खोलीत नेऊन बंदिस्त केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेत पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Gadchiroli Crime news : रक्षाबंधनदिवशी गडचिरोलीत धक्कादायक घटना, तरुणीचे कपडे फाडून बेदम मारहाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल