शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी असलेल्या सोनाने तिच्या चिठ्ठीत तिचा प्रियकर रमीझ, त्याचं कुटुंब आणि मित्रांवर धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. रमीझ सोनाला लग्नाची नोंदणी करण्याच्या बहाण्याने आपल्या घरी घेऊन गेला. यानंतर रमीझच्या कुटुंबाने सोनाला इस्लाम धर्म स्वीकारला तरच रमीझशी तुझं लग्न होऊ शकतं, असं सांगितलं.
रमीझला अटक
सोनाची चिठ्ठी मिळाल्यानंतर पोलिसांनी रमीझला ताब्यात घेतलं असून त्याला अटकही करण्यात आली आहे. रमीझवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 69 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक संबंधांशी संबंधित आहे. केरळच्या एरनाकुलम जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
advertisement
सोनाची आई बिंदू ही घरकाम करणारी महिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनाच्या आईने रमीझच्या कुटुंबावर आरोप केले आहेत. रमीझच्या कुटुंबाने लग्नाचा प्रस्ताव आणला, पण त्यांनी लग्नासाठी धर्मांतर करण्याचा आग्रह धरला. सोना सुरूवातीला प्रेमापोटी सहमत झाली, पण नंतर रमीझचं नाव अनैतिक तस्करीच्या प्रकरणात जोडलं गेलं आणि तिने याला नकार दिला, असं सोनाची आई म्हणाली आहे.
माझ्या मुलीचं रमीझवर खरोखर प्रेम होतं, तस्करी प्रकरणानंतरही ती रमीझसोबत लग्न करायला तयार होती, पण तिने धर्मांतराला नकार दिला. यानंतर रमीझच्या कुटुंबाने सोनाला एका खोलीमध्ये बंद केलं आणि तिला मारहाण करून धमकी दिली, असा आरोपही सोनाच्या आईने केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून रमीझच्या संपूर्ण कुटुंबाची चौकशी सुरू आहे.