आकाश उर्फ आक्या बनसोडे असं हल्ला झालेल्या रीलस्टार तरुणाचं नाव आहे. तो सोशल मीडियावर विविध विषयांवर रील्स बनवत असतो. गुरुवारी रात्री त्याच्यावर हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका रीलस्टार तरुणावर अशाप्रकारे हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश बनसोडे हा वाघोली परिसरातील बाईक रोड या ठिकाणी वास्तव्यास आहे. त्याचे उबाळे नगर येथे हिरो मोटार शोरूम समोर न्यू मेन्स वेअर कपड्यांचे दुकान आहे. गुरुवारी रात्री तो याच दुकानात होता. त्यावेळेस त्याच्या दुकानात तीन जण अचानक आले आणि शिवीगाळ करत 'थांब तुझा गेमच करतो', असं म्हणत त्याच्यावर धारदार शास्त्राने वार करण्यास सुरुवात केली. या तिघांनी आकाश बनसोडेवर पाठीमागून डोक्यावर भुवई जवळ, ओठांजवळ, पायाच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार केले. या प्रकरणी जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा यानंतर दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ज्ञानोबा जाधव (वय १८) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी खराडी येथे राहणाऱ्या अनिकेत दीपक वानखेडे, प्रवीण गोविंद माने व एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. वाघोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
