यशवंत पेठकर यांनी सांगितले की व्हीनस ट्रेडर्स आणि रायटिंग वंडर्स संस्थेतर्फे जगभरातील पेनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून हे प्रदर्शन सातत्याने भरवण्यात येत आहे. या प्रदर्शनातून पुणेकरांना जगभरातील विविध प्रकारची पेन पाहण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनात जर्मनी, जपान, इंग्लंड, अमेरिका आदी अनेक देशांतील पेन पाहायला मिळणार आहेत. हा महोत्सव एरंडवणे येथील म्हात्रे पुलाजवळ, डी.पी. रस्त्यावरील सिद्धी बँक्वेट्स येथे आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव काल, 10 जानेवारीपासून सुरू झाला असून आज, 11 जानेवारीपर्यंत चालणार आहे. सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत नागरिकांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे.
advertisement
Pune Pen Festival: 10 रुपये नव्हे 10 लाखांचा पेन, का आहे खास? पुण्यात भरलंय प्रदर्शन, Video
300 रुपयांपासून ते तब्बल 10 लाखापर्यंतचे पेन
या प्रदर्शनात 300 रुपयांपासून ते तब्बल 10 लाखापर्यंतचे विविध प्रकारची पेन पाहायला मिळणार आहेत. जगभरातील 75 हून अधिक पेन उत्पादकांची पेन येथे पाहता आणि प्रत्यक्ष हाताळता येणार आहेत. यामध्ये विस्कोन्टी, मोंटेग्राप्पा, वॉटरमॅन, डिप्लोमॅट, एस. टी. ड्यूपॉन्ट, पेनिन्फेरिना यांसारखे आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्स यासह इतर नामांकित ब्रँड्सचा समावेश आहे.
भारतासह जगभरातील 15 पेक्षा अधिक शाईचे ब्रँड्स लॅमी, कलरव्हर्स, नूडलर्स, पेलिकन, डायमाइन यासह इतर नामांकित ब्रँड्स या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. प्रदर्शनात 500 हून अधिक शाईच्या विविध छटा पाहायला मिळणार असून, जुन्या काळातील लेखन साहित्यही येथे पाहायला मिळणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे.





