Pune: मित्राचं घरभाडं थकलं होतं, तरुणीने आखला खतरनाक प्लॅन, दोघांना सुरी घेऊन काकूच्या घरात घुसवलं अन्...

Last Updated:

पुण्याच्या येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका तरुणीने मित्राचं घरभाडं थकल्याने थेट गुन्हेगारी कृत्य केलं आहे.

News18
News18
पुण्याच्या येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका तरुणीने मित्राचं घरभाडं थकल्याने थेट गुन्हेगारी कृत्य केलं आहे. तिने आपल्या काकूच्याच घरात दरोडा टाकण्याचा प्लॅन केला. यासाठी तिने आपल्या दोन मित्रांना सुरी आणि दोरी घेऊन काकूच्या घरात घुसायला सांगितलं. दोघांना अशा अवस्थेत बघून काकूंनी आरडाओरडा केला. यानंतर दोन्ही आरोपी पळून केले. या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणीसह तिच्या तिघांना अटक केली
यश मोहन कुर्हाडे (वय २०, रा. केसनंद), वृषभ प्रदीप सिंग (वय २१, रा. चऱ्होली, आळंदी रस्ता) आणि प्राज विवेक भैरामडगीकर (वय १८, रा. येरवडा) असं अटक केलेल्या तिन्ही आरोपींची नावं आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात साथ देणाऱ्या तक्रारदार महिलेच्या अल्पवयीन पुतणीला देखील अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
advertisement
नेमकं प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कल्याणीनगर परिसरात भरदिवसा एका सदनिकेत घुसून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दोन अज्ञात तरुण तोंडाला कपडा बांधून घरात घुसले होते. पण घरातील महिलेनं आरडाओरडा केला असता दोन्ही आरोपी पळून गेले. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या प्रकरणाचा छडा लावला. एका अल्पवयीन पुतणीने मित्राचे थकीत घरभाडे भरण्यासाठी काकूच्या घरीच दरोडा टाकण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
advertisement
ही घटना ५ जानेवारी रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास कल्याणीनगर भागात घडली. तक्रारदार महिला आपल्या घरात होती. यावेळी चेहरा झाकलेले दोन अज्ञात व्यक्ती सुरी आणि दोरी घेऊन घरात घुसले. महिलेने त्यांना पाहताच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. महिलेचा आवाज ऐकून सोसायटीतील रहिवासी जमा होऊ लागल्याने दोन्ही आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक व्यक्ती सोसायटीच्या परिसरात थांबलेला दिसला, ज्याने आपला चेहरा झाकलेला होता. पोलिसांनी तपास सुरू केला.
advertisement
दरोड्याचा प्रयत्न झाला तेव्हा महिलेची अल्पवयीन पुतणी घरात उपस्थित होती. पोलिसांनी तिची चौकशी केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. तिच्या बोलण्यात पोलिसांना विसंगती आढळली. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. सखोल चौकशीनंतर पुतणीने मित्राचे घरभाडे थकल्यामुळे काकूच्या घरात दरोडा टाकण्याचा कट रचल्याची कबुली दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune: मित्राचं घरभाडं थकलं होतं, तरुणीने आखला खतरनाक प्लॅन, दोघांना सुरी घेऊन काकूच्या घरात घुसवलं अन्...
Next Article
advertisement
Tejasvi Ghosalkar On Uddhav Thackeray: 'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरमधलं राजकारण तापलं
'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरम
  • मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे

  • भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला

  • दहिसरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर असता तर त्याने पक्ष सोडला नस

View All
advertisement