काय सांगता! 54 वर्षांनी घडणार काही तरी मोठं, मकर संक्रांतीची तारीख कायमची बदलणार?

Last Updated:

हिंदू धर्मातील बहुतेक सण तिथीनुसार बदलतात, परंतु 'मकर संक्रांत' हा एकमेव असा सण आहे जो दरवर्षी साधारणपणे 14 किंवा 15 जानेवारीलाच येतो. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की, पूर्वी हा सण कोणत्या तारखेला येत होता.

News18
News18
Makar Sankranti : हिंदू धर्मातील बहुतेक सण तिथीनुसार बदलतात, परंतु 'मकर संक्रांत' हा एकमेव असा सण आहे जो दरवर्षी साधारणपणे 14 किंवा 15 जानेवारीलाच येतो. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की, पूर्वी हा सण कोणत्या तारखेला येत होता? शास्त्र आणि खगोलविज्ञानानुसार, दर 71 ते 72 वर्षांनी मकर संक्रांतीची तारीख एक दिवसाने पुढे सरकते. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे पूर्णपणे वैज्ञानिक सत्य आहे.
पृथ्वीचा 'अक्षीय संथ फेरा'
पृथ्वी स्वतःच्या अक्षावर फिरताना थोडी कललेली आहे आणि ती एका 'भोवऱ्यासारखी' संथ गतीने गोलाकार फिरते. यालाच खगोलशास्त्रात 'प्रिसेशन ऑफ इक्विनॉक्स' म्हणतात. या प्रक्रियेमुळे पृथ्वीचा अक्ष दर 72 वर्षांनी 1 अंशाने सरकतो.
72 वर्षात 1 दिवसाचा फरक
खगोलीय गणनेनुसार, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, त्याला आपण मकर संक्रांत म्हणतो. पृथ्वीच्या संथ गतीमुळे दर 72 वर्षांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्यास सुमारे 20 मिनिटांचा उशीर होतो. हा वेळ साठत जातो आणि अंदाजे 71 ते 72 वर्षांनंतर पूर्ण 24 तास म्हणजेच एक दिवसाचा फरक पडतो.
advertisement
भविष्यात काय होईल?
सध्या आपण संक्रांत 14 किंवा 15 जानेवारीला साजरी करतो. मात्र, खगोल तज्ज्ञांच्या मते, सन 2080 नंतर मकर संक्रांत कायमस्वरूपी 15 जानेवारीला येईल आणि सन 3246 पर्यंत ही तारीख 1 फेब्रुवारी पर्यंत पुढे सरकलेली असेल.
लीप इयरचा प्रभाव
दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षामुळे कॅलेंडरमध्ये एक दिवस वाढतो, ज्यामुळे संक्रांत कधी 14 तर कधी 15 जानेवारीला येते. मात्र, 72 वर्षांचा बदल हा पृथ्वीच्या अक्षातील बदलामुळे होणारा कायमस्वरूपी बदल आहे.
advertisement
उत्तरायण आणि मकर संक्रांत
खऱ्या अर्थाने सूर्य 21-22 डिसेंबरलाच उत्तर दिशेला झुकू लागतो. मात्र, भारतीय पंचांग हे 'निरयन' पद्धतीवर आधारित असल्याने आपण सूर्याच्या राशी प्रवेशाला महत्त्व देतो, जो आता 14 जानेवारीला होतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
काय सांगता! 54 वर्षांनी घडणार काही तरी मोठं, मकर संक्रांतीची तारीख कायमची बदलणार?
Next Article
advertisement
Tejasvi Ghosalkar On Uddhav Thackeray: 'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरमधलं राजकारण तापलं
'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरम
  • मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे

  • भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला

  • दहिसरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर असता तर त्याने पक्ष सोडला नस

View All
advertisement