TRENDING:

लोकांच्या रक्षकावरच आली पोलीस ठाणं गाठण्याची वेळ; नवीन घराचं स्वप्न पाहिलं पण लागला 1 कोटींचा चुना

Last Updated:

जमीन विक्रीचे आश्वासन देत मोठी रक्कम उकळण्यात आली, मात्र नोंदणीकृत खरेदीखत न करता वारंवार टाळाटाळ करण्यात आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवहाराचे आमिष दाखवत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाची तब्बल 1 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जमीन विक्रीचे आश्वासन देत मोठी रक्कम उकळण्यात आली, मात्र नोंदणीकृत खरेदीखत न करता वारंवार टाळाटाळ करण्यात आली. बाऊन्स झालेले धनादेश, बनावट करारनामे आणि मुखत्यारनामा (जीपीए) यांचा आधार घेत ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार 15 ते 20 फेब्रुवारी 2024 दरम्यान दिल्ली गेट परिसरातील सलमान हॉल येथे घडला.
News18
News18
advertisement

‎या प्रकरणी शेख शफीक शेख सलमान, गौसिया बेगम शेख शफीक, शेख शफीक उर्फ शेख साहब (सर्व रा. सलमान हॉल, दिल्ली गेट), शेख जमील शेख गुलाम रसुल (34, रा. ईदगाह झोपडपट्टी, रोजेबाग) आणि शेख इम्रान शेख गफ्फार (रा. कैसर कॉलनी) यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकतानगर परिसरातील गोरख मानसिंग चव्हाण (60) यांनी याबाबत फिर्याद दिली. चव्हाण हे पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले असून सध्या जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात.

advertisement

Thane : विजयाचे सेलिब्रेशन पडलं महागात, ठाण्यात फटाके फोडताना कारवर पडल्या ठिणग्या; VIDEO पाहा

तक्रारीनुसार, 2023 मध्ये यासीन खान यांच्या माध्यमातून चव्हाण यांची ओळख शेख इरफान याच्याशी झाली. इरफान जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगत त्याने हिमायतबाग परिसरातील चाऊस कॉलनी येथील गट क्रमांक 19/1 मधील 18.7 आर जमीन विक्रीस असल्याची माहिती दिली. ही जमीन शेख जमील यांच्या नावावर असल्याचे सांगत इरफान आणि त्याच्या कुटुंबीयांनी चव्हाण यांचा विश्वास संपादन केला.

advertisement

View More

‎यानंतर आरोपींनी सातारा परिसरातील रो-हाऊस विक्रीचा तात्पुरता करार केला. मात्र त्या व्यवहारातील सहमालकाने इरफानने कोणतीही रक्कम दिलेली नसल्याचे स्पष्ट केल्याने संशय निर्माण झाला आणि फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर चव्हाण यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. तपासानंतर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.

advertisement

‎दरम्यान, आरोपींनी पैसे परत देणे शक्य नसल्याचे सांगत हिमायतनगर परिसरातील प्लॉट क्रमांक 83 ते 86 देण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्ष खरेदीखत न करता केवळ नोंदणीकृत मुखत्यारनामा करून देण्यात आला आणि त्या प्लॉटचा ताबा देखील देण्यात आला नाही. पुढे दिल्ली गेट येथील सलमान हॉलमधील दोन दुकाने विक्री करण्याचा करार करण्यात आला. दुकाने ताब्यात घेण्यासाठी चव्हाण व त्यांचे भागीदार गेले असता शेख शफीक उर्फ शेख साहब याने बंदूक दाखवत पुन्हा येथे आलात तर गोळी घालण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

advertisement

हा संपूर्ण व्यवहार 2 कोटी रुपयांत ठरला होता. त्यानुसार चव्हाण यांनी 20 लाख रुपये आरटीजीएसद्वारे दिले, तर त्यांचे मित्र यासीन खान यांनी विविध तारखांना रोख रक्कम दिली. 15 ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत एकूण 1 कोटी 33 लाख रुपये इरफान याला देण्यात आले. ही रक्कम मिळाल्याची नोंद त्याने स्वतःच्या हस्ताक्षरात रजिस्टरमध्ये लिहून दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

‎मात्र एवढी मोठी रक्कम घेतल्यानंतरही इरफानने जमीन नोंदणीकृत करून देण्यास टाळाटाळ केली. पैसे परत मागितल्यावर त्याने जुलै 2024 मध्ये समजुतीचा करार करत 40 लाख रुपयांचे तीन धनादेश दिले. परंतु हे धनादेश बँकेत वटले नाहीत. त्यानंतर दिलेले इतर धनादेशही खाते बंद असल्याने परत आल्याचे समोर आले.

मराठी बातम्या/क्राइम/
लोकांच्या रक्षकावरच आली पोलीस ठाणं गाठण्याची वेळ; नवीन घराचं स्वप्न पाहिलं पण लागला 1 कोटींचा चुना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल