पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दुर्गानगर परिसरातील कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. पापा मडावी असं हत्या झालेल्या वृद्धाचं नाव आहे. पापा मडावी हे शासकीय मुद्रणालयातून सेवानिवृत्त झाले होते. या परिसरात तीन वर्षांपासून ते वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे. दोघीही खाजगी कंपनीत काम करतात. तर पत्नी गृहिणी आहे. मृत मडावी हे घरीच एकटेच होते. याचाच फायदा घेऊन चोराने घरात प्रवेश केला. त्यांनी चोराला विरोध केला असता चाकूने वार करून पळ काढला. त्याची पत्नी दुपारी चार वाजता नंतर परतली असता घरात त्याची रक्ताने माखलेला मृतदेह आढळला.
advertisement
त्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना सागून पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कोराडी पोलिस ठाण्यात पोहचल्यावर घराची पाहणी केली. मृतक आणि आरोपी यांच्यामध्ये झटापट झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असताना कपाटातील साहित्य फेकलेल दिसून आले. आरोपी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले असावेत आरोपीचा अद्यापपर्यंत सुगावा लागला नसला तरी ते दरोड्याच्या उद्देशाने घरात शिरले. वृद्धाने प्रतिकार केल्याने हल्ला करत हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही नसल्याने आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.