TRENDING:

Sangli Crime: सांगलीत नवरा झाला सैतान; कुऱ्हाड घेतली अन् बायकोच्या डोक्यात मारली अन् स्वत: पोलिसात गेला

Last Updated:

सांगलीत शिंदेमळा कुरणे गल्लीत पत्नीची डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सकाळी घडली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली:   शिंदेमळा कुरणे गल्लीत किरकोळ वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर पती स्वत: पोलिस स्टेशनमध्ये हजर होत खून केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलंय.
News18
News18
advertisement

सांगलीत शिंदेमळा कुरणे गल्लीत पत्नीची डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सकाळी घडली आहे. घरगुती वादातून पतीनेच पत्नीच्या मानेवर कुराडीने हल्ला करीत तिचा खून केला. पतीच्या हल्ल्यात पत्नी अनिता सीताराम काटकर हिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पती स्वतः हा पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला आहे.

मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला 

advertisement

समोर आलेल्या माहितीनुसार, अनिता काटकर या भाजी विक्रीचा व्यवसाय करत होत्या. तर पतीही तिच्या सोबत भाजी विक्री करत होता. आज सकाळी राहत्या घरी पती सिताराम काटकर आणि पत्नीमध्ये काही शुल्लक कारणांवरून वाद झाले. त्यानंतर पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला. या वर्मी घावात अनिताचा जागीच मृत्यू झाला. खुनाच्या घटनेनंतर पती सिताराम काटकर हा स्वतःहून पोलीसात हजर झाला. शिंदेमळा कुरणे गल्लीत घडलेल्या घटनेने खळबळ माजली आहे. पहाटे साडे पाचच्या सुमारास खुनाचा प्रकार घडला आहे.

advertisement

घरगुती वादातूनच खून

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

तर घटनेनंतर संजयनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासाणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. घरगुती वादातूनच खून झाल्याचे बोललं जातं आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
Sangli Crime: सांगलीत नवरा झाला सैतान; कुऱ्हाड घेतली अन् बायकोच्या डोक्यात मारली अन् स्वत: पोलिसात गेला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल