संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदार याने स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करतानाचे तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढले होते. यात संतोष देशमुखांच्या शेवटच्या क्षणांची मिनिट टू मिनिट अपडेट पोलिसांच्या हाती लागली आहे. घटनेच्या दिवशी 9 डिसेंबरला 3 वाजून 46 मिनिटांनी नराधमांनी संतोष देशमुखांना मारहाण करायला सुरुवात केली होती. पहिल्या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. तर शेवटचा व्हिडिओ हा 5 वाजून 53 मिनिटांचा आहे. ज्यात संतोष देशमुख यांचा विव्हळतानाचा अतिशय बारीक आवाज येत आहे. यावेळी संतोष देशमुख मरणासन्न अवस्थेत पोहोचले होते, असं सांगितलं जातं. यानंतर काही वेळातच देशमुखांनी अखेरचा श्वास घेतला
advertisement
तब्बल दोन तास ७ मिनिटं म्हणजे जवळपास १२७ मिनिटं आरोपी संतोष देशमुख यांना मारत होते, असं या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. या फोटो आणि व्हिडिओ संदर्भातील डिटेल्स रिपोर्ट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले आहेत. या व्हिडिओ आणि फोटो मधील माहिती मधून संतोष देशमुख यांना मारहाण करायला कधी सुरुवात केली... आणि संतोष देशमुख यांचा मृत्यू कधी झाला हे स्पष्ट होत आहे.
सर्व व्हिडिओ हे 9 डिसेंबरचे आहेत
- व्हिडिओ क्र. 1
9 डिसेंबर रोजी 3 वाजून 46 मिनिटांनी मारहाणीला सुरुवात केली. महेश केदारच्या मोबाईल मधील पहिला व्हिडिओ...VID20241209154453 हा तब्बल एक मिनिट दहा सेकंदाचा असून याची साईज 171MB इतकी आहे. या व्हिडीओत मारेकरी संतोष देशमुख यांना पांढऱ्या रंगाचा पाईप आणि वायर सारख्या हत्याराने तसेच लाथा बुक्क्याने मारहाण करत आहेत.
- व्हिडीओ क्र. 2
वेळ 15.47.02 - 53 सेकंदाच्या या व्हिडीओत आरोपी संतोष देशमुखांना शिवीगाळ करून मारहाण करत आहेत. यातही पांढऱ्या रंगाचा पाईप आणि वायरने मारहाण केली जात आहे. तसेच संतोष देशमुख यांची पॅन्ट काढताना या व्हिडीओत दिसत आहे.
- व्हिडिओ क्र 3
वेळ 15.48.00 (35 सेकंद 86.9 MB) या व्हिडीओत संतोष देशमुख यांना बुटाच्या सह्याने मारहाण होत आहे. तर दुसरा आरोपी हातात वायरसारखे हत्यार घेऊन पाठीमागे लावलेल्या मुठीने मारहाण करत आहे.
- व्हिडिओ क्र.4
वेळ 15.51.43 ( 2.04 सेकंद, 300 MB) २ मिनिटं ४ सेकंदाच्या या व्हिडीओत संतोष देशमुखांना शिवीगाळ करून लवचिक पाईपने मारहाण केली जात आहे. यात शूटिंग करणारा महेश केदार असल्याचे दिसत आहे. याच व्हिडिओमध्ये सुदर्शन घुलेची गाडी देखील दिसत आहे.
- व्हिडिओ क्रमांक- 5
वेळ- 15.52.26 (7 सेकंद) - 7 सेकंदांच्या या व्हिडीओत आरोपी देशमुखांना मारहाण करताना कॉलरला उठून बसवताना दिसत आहेत.
- व्हिडिओ क्रमांक. 6
वेळ 15.53.59 (36 सेकंद) या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना तोंडावर तसेच इतर ठिकाणी मारहाण झालेली दिसत आहे.
- व्हिडिओ क्रमांक. 7
वेळ 15.54.22(14 सेकंद) या व्हिडीओत आरोपी तपकिरी रंगाच्या पाईपने देशमुखांना मारहाण करत आहेत. यात मोबाईलमध्ये शूट करताना एका व्यक्तीचा हात दिसत आहे.
- व्हिडिओ क्रमांक.8
वेळ 15.54.32 (4 सेकंद) या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना बळजबरीने काहीतरी विचारताना दिसत आहेत.
- व्हिडिओ क्र.9
वेळ - 15.55.27 (52 सेकंद) - या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना तोंडावर तसेच इतर ठिकाणी मारहाण झालेली दिसत आहे. तसेच घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावून खाली पाडून जखमीच्या तोंडावर उभ्याने लघवी करताना दिसत आहे.
- व्हिडिओ क्रमांक. 10
वेळ- 15.58.56- २ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना अंगावरील सर्व कपडे काढून अंडरवियरवर बसून पाईपने मारहाण केली जात आहे, दुसरा व्यक्ती शूटिंग करत आहे.
- व्हिडिओ क्रमांक.11
वेळ- 15.58.56 - 5 सेकंदाच्या या व्हिडीओत जखमी संतोष देशमुख यांना अंडरवेअरवर बसून दुसरा व्यक्ती शूटिंग करत आहे.
- व्हिडिओ क्रमांक.12
वेळ - 15.59.18 - 12 सेकंदाच्या या व्हिडीओत संतोष देशमुख यांना अंडरवेअरवर बसून जबरदस्तीने केस ओढून बोलण्यास भाग पाडलं जातंय.
- व्हिडिओ क्रमांक.13
वेळ 17.34.05 - 1.44 सेकंदाच्या या व्हिडीओत संतोष देशमुख यांना या व्हिडिओमध्ये स्कार्पिओ रंगाच्या गाडीजवळ अंडरवेअरवर उताणे स्थितीत झोपवल्याचे दिसत आहे. तसेच आरोपी हे संतोष देशमुख यांना रक्ताचे दाग असलेले पॅन्ट घालताना दिसत आहेत.
- व्हिडिओ क्रमांक .14
वेळ 17.35.16, एक मिनिट चार सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख याला उठवून बसवून शर्ट घालताना दिसत आहे. शर्ट घालण्या अगोदर फाटलेले व रक्ताने भरलेले बनियान फेकून देताना दिसत आहेत.
- व्हिडिओ क्रमांक.15
वेळ 17.53.52 - 24 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कन्हत असल्याचा आवाज येत आहे. या १५ व्हिडीओजशिवाय आठ फोटोही आहेत. ज्यात नराधमांनी किती अमानुषपणे संतोष देशमुखांना मारलं आहे. हे यातून दिसत आहे.