अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पीडित मुलीची आई आकाडी जेवणासाठी मदत करण्याकरिता एका कार्यक्रमाला गेली होती. त्यावेळी ती आपल्या मुलीलाही सोबत घेऊन गेली होती. याच संधीचा फायदा आरोपीने घेतला. आरोपी युवकाने आपल्या घरात या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोक्सो कायद्याअंतर्गत अटक
अल्पवयीन मुलीने झालेली घटना आईला सांगितल्यावर धक्काच बसला. त्यानंतर या गंभीर प्रकाराची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल होताच, पोलिसांनी तातडीने सूत्रं हलवत रात्री उशिरा त्या युवकाला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक केली आहे. 18 वर्षाच्या युवकाच्या या कृत्यामुळे आता खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
साताऱ्यात चाललंय काय?
दरम्यान, साताऱ्यात एका प्रेमी तरुणाने खळबळ उडवून दिली होती. एका युवकाचे अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. त्यावरुन संबंधित युवकाकडून आधी देखील पीडित मुलीला त्रास देण्यात आला होता. आता त्या शाळकरी मुलीला त्या युवकाने ताब्यात घेतलं आणि तिच्या गळ्याला चाकू लावला होता. त्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे.