मीना अहिरवार असं या महिलेचं नाव आहे. 11 फेब्रुवारीला तिचा मृतदेह पोत्यात बांधून नाल्यात फेकलेल्या अवस्थेत आढळला. प्रेमप्रकरणातील विश्वासघातातून हे घडल्याचं वरकरणी दिसून येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतलं असून, मारेकऱ्याच्या शोधात आहेत. मीनाचं वय 50 वर्षं असून, तिचं माहेर मध्य प्रदेशातील टिकमगड हे होतं. सुमारे 18 वर्षांपूर्वी तिने प्रियकरासाठी आपल्या पती आणि तीन मुलांना सोडलं. राजकुमार असं तिच्या प्रियकराचं नाव होतं. झाशी इथे ते दोघं राहात होते. करोना काळात राजकुमारचा मृत्यू झाला. त्यानंतर मीना एकटी पडली.
advertisement
याचदरम्यान, आपल्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या एका तरुणाबरोबर ती राहू लागली. तो तिचा बॉयफ्रेंड असून, त्यांच्यात प्रचंड वाद होत असल्याची चर्चा आहे. त्या दोघांचा एकमेकांच्या गैरकृत्यांमध्ये सहभागही होता. अशातच 11 फेब्रुवारीला नाल्यात एका पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मीनाचा मृतदेह पोलिसांना सापडला. मात्र, त्याची ओळख पटण्यास दोन दिवस लागले. मीनाच्या मुलानेच तिच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे. मीनाच्या उजव्या हातावर राजकुमार तर डाव्या हातावर स्टार आणि एस असे टॅटू आढळले. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं असून, अधिक तपास करत आहेत.
मीनाचा विवाह उत्तम याच्याशी झाला होता. ललितपूर जिल्ह्यातील महरोनी इथे त्यांचं वास्तव्य होतं. त्यांना अभिषेक, संगीता आणि लखन अशी तीन मुलं आहेत. दरम्यान मीना आणि राजकुमार यांच्यात प्रेमाचं नातं निर्माण झालं. मीना पती आणि तीन मुलांना सोडून राजकुमार बरोबर झाशी इथे राहू लागली. करोना काळात राजकुमारचा मृत्यू झाला. राजकुमारच्या मृत्यूनंतर तिची ओळख तिच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या एका तरुणाशी झाली. या तरुणाबरोबर ती राहू लागली मात्र त्यांच्यात सातत्याने वाद होत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. रोज कामावर जाते असं सांगून ती घराबाहेर पडत असे, मात्र काय काम करते याबाबत कुणालाही माहिती देत नसे. त्यामुळेच ती काही तरी गैरवर्तन करत असल्याचा संशय होता असंही शेजाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. मागील शुक्रवारी कामाला जाते असं सांगून मीना घराबाहेर पडली मात्र त्यानंतर तिचा मृतदेहच सापडला.