TRENDING:

मित्रच बनला जानी दुष्मन, बायकोसोबत केली नको ती कृत्य, 30 वर्ष जुन्या मैत्रीचा हादरवणारा शेवट!

Last Updated:

विजय कुमार आणि धनंजय या दोघांचीही मैत्री पाहून लोक त्यांना प्रेमाने जय-वीरू म्हणायचे. विजय कुमार आणि धनंजय हे 30 वर्षांपासूनचे मित्र होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Crime : विजय कुमार आणि धनंजय या दोघांचीही मैत्री पाहून लोक त्यांना प्रेमाने जय-वीरू म्हणायचे. विजय कुमार आणि धनंजय हे 30 वर्षांपासूनचे मित्र होते. एकत्र खेळणे, अभ्यास करणे आणि सुख-दु:खाच्या क्षणांमध्ये दोघांनी एकमेकांना कायमच साथ दिली, पण दोघांच्या आयुष्यात एका महिलेची एन्ट्री झाली आणि त्यानंतर सगळं चित्रच बदलून गेलं.
मित्रच बनला जानी दुष्मन, बायकोसोबत केली नको ती कृत्य, 30 वर्ष जुन्या मैत्रीचा हादरवणारा शेवट!
मित्रच बनला जानी दुष्मन, बायकोसोबत केली नको ती कृत्य, 30 वर्ष जुन्या मैत्रीचा हादरवणारा शेवट!
advertisement

विजयने दहा वर्षांपूर्वी आशाशी लग्न केले. लग्नानंतर दोघांचा संसार आनंदाने सुरू झाला. विजय रिअल इस्टेट आणि आर्थिक बाबींमध्ये व्यस्त होता, तर आशा घराची काळजी घ्यायची. पण कालांतराने त्यांच्या नात्यात तडा गेला. विजयला संशय आला की त्याची पत्नी आशाचे त्याचाच मित्र धनंजयसोबत अनैतिक संबंध आहेत. मग एके दिवशी त्याने दोघांनाही रंगेहाथ पकडले. तसंच त्याला दोघांचे असे काही फोटोही सापडले, ज्यामुळे त्याचा संशय खरा ठरला. विजयसाठी हा एक मोठा धक्का होता.

advertisement

30 वर्षांच्या मैत्रीचा काटा काढला

विजयने नाते वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने नवीन सुरुवात करण्यासाठी माछोहल्लीमध्ये आशासोबत भाड्याने घर घेतले. पण त्यांच्यातील भांडणे थांबली नाहीत. यानंतर आशा आणि धनंजय यांनी मिळून एक धक्कादायक कट रचला. त्यांना विजयला संपवायचे होते. एके दिवशी त्याचा मृतदेह माछोहल्लीच्या डी-ग्रुप लेआउटमध्ये सापडला. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा असे आढळून आले की माछोहल्ली क्रॉसजवळ विजयवर दोन अज्ञात लोकांनी हल्ला केला होता, या हल्ल्यात विजयचा मृत्यू झाला.

advertisement

पोलिसांना संशय होता की ही हत्या सामान्य घटना नाही. तपासात आशा आणि धनंजय यांनी मिळून या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले. आशाला पोलिसांनी ताब्यात घेतले, पण धनंजय पळून गेला. बंगळुरू पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, जेणेकरून धनंजयला पकडता येईल आणि सत्य समोर येईल.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
मित्रच बनला जानी दुष्मन, बायकोसोबत केली नको ती कृत्य, 30 वर्ष जुन्या मैत्रीचा हादरवणारा शेवट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल