आरोपींचा शोध सुरू असताना स.पो.नि. नागनाथ खुणे यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरेपाटील व अक्षय खांडवी यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली. चैतन्य शेळके रा. भोत्रा व करण भोसले रा. खांडवी, बार्शी हे दोघे देशी बनावटीचे गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह बार्शीवरून सोलापूरला येणार होते. बार्शी तालुका हद्दीतील चोरलेल्या (दुचाकी क्रमांक MH 14 GA 4210) दुचाकीवरून ते येणार असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांच्या पथकाने सोलापूर - बार्शी जाणाऱ्या रोडवरील कारंबा गावाच्या पुढे वाहन रोडच्या कडेला एका झाडाखाली उभे केलेले दिसले.
advertisement
हँडल नाही, स्टेअरिंग आहे! 1970 सालची 150 रुपयांची 'टार्झन' सायकल; वाचा 50 वर्षांचा अनोखा प्रवास!
पोलिसांनी लगेच आरोपी चैतन्य ऊर्फ भैय्या पांडुरंग शेळके व करण भोसले यांना बार्शी रोडवरील कारंबा येथे पकडले. त्या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसे व चोरीतील कार मिळाली. त्यांनी कुर्डूवाडी ते बार्शी रोडवर कारचालकाला पिस्टलचा धाक दाखवून लुटले होते व त्याची सोन्याची लॉकेटही काढून घेतल्याचे त्यांनी सांगितले. तर आरोपींना मारुती माने यांनी गावठी पिस्टल विकले होते.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बार्शी तालुका पोलीस ठाणे, करमाळा, कामती, कुर्डूवाडी, वैराग, बार्शी शहर, तुळजापूर पोलीस ठाणे येथील प्रत्येकी एक असे 4 जबरी चोरीचे, 3 वाहन चोरीचे व 1 आर्मस् अॅक्ट असे 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत.






