ही घटना लातुरमधील वाल्मीकनगर येथे घडली. पोलिसांनी सांगितलं की, इथे सुभाषचंद्र कंदले (वय 85) हे आपली 79 वर्षीय पत्नी प्रभावती कंदले आणि मानसिक रुग्ण असलेला 45 वर्षीय मुलगा पूनमचंद्र कंदले यांच्यासोबत राहतात. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास प्रभावती कंदले या आपल्या मुलासाठी जेवणाचं ताट घेऊन त्याच्या खोलीत गेल्या होत्या. याचवेळी मुलाने आईच्या डोक्यावर काठीने वार केला.
advertisement
ती विरोध करत होती पण पतीने ऐकलं नाही; स्वतः केली पत्नीची प्रसूती, घरभर रक्त अन् महिलेचा मृत्यू
यात महिला गंभीर जखमी झाली आणि जागेवरच कोसळली. यातच महिलेचा मृत्यू झाला. आरोपी मुलाचे वडील बाहेर अंथरुणावर पडून होते. पत्नी बराच वेळ मुलाच्या खोलीतून बाहेर न आल्याने आणि मुलाचाही आवाज येत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांना आवाज दिला असता आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर घाबरून त्यांनी त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला फोन करून याबाबतची माहिती दिली.
दुसरा मुलगा जयकुमार कंदले हा तातडीने घरी पोहोचला. त्याने दरवाजा वाजवत आईला आणि भावाला आवाज देण्यास सुरूवात केली. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आरोपी मुलाने खोलीच्या दरवाजाची कडी आतून लावली होती. त्यामुळे पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत खोलीचा दरवाजात उघडला, तेव्हा महिलेचा मृतदेह पाहून सगळे हादरले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. बुधवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
