ती विरोध करत होती पण पतीने ऐकलं नाही; स्वतः केली पत्नीची प्रसूती, घरभर रक्त अन् महिलेचा मृत्यू
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
महिलेला तिच्या पतीने घरीच प्रसूती करण्यास भाग पाडलं. प्रसूतीसाठी महिलेच्या पतीने तिला रुग्णालयात नेलं नाही, तर यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून तिची प्रसूती सुरू केली.
नवी दिल्ली: यूट्यूब व्हिडिओ पाहून केलेलं एक कृत्य एका व्यक्तीला इतकं महागात पडलं की यामुळे त्याने आपली पत्नी आणि मुलगा गमावला. एक 36 वर्षीय केरळची महिला आणि तिच्या नवजात बाळाचा अयशस्वी प्रसूतीमुळे घरीच मृत्यू झाला. खरं तर, महिलेला तिच्या पतीने घरीच प्रसूती करण्यास भाग पाडलं. सुरक्षित प्रसूतीसाठी महिलेच्या पतीने तिला रुग्णालयात नेलं नाही, उलट यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून तिची प्रसूती सुरू केली. त्यानंतर घरात मुलाला जन्म देताना महिलेचा मृत्यू झाला.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी तिरुअनंतपुरमच्या नेमोम भागात ही घटना उघडकीस आली. बुधवारी पोलिसांनी पती नायस याच्यावर हत्येचा आणि आयपीसीच्या कलम 315 (मुलाला जिवंत जन्माला न येऊ देणं किंवा जन्मानंतर मारण्याच्या उद्देशाने केलेलं कृत्य) च्या आरोपात अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, इतर लोकांचा, विशेषत: त्याची पहिली पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांचा यातील सहभाग तपासला जात आहे.
advertisement
हेल्थ वर्क्सने दिलेल्या माहितीनुसार, शमीरा बीवी असं मृत महिलेचं नाव असून यापूर्वी तिच्या तीन सिझेरियन प्रसूती झाल्या होत्या. मंगळवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नायसची पत्नी गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्याच घरी होती. प्रसूती वेदना सुरू होताच आरोपी नायसच्या पहिल्या पत्नीने नायससोबत घरी यूट्यूब व्हिडिओ पाहून प्रसूती करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. शमीरा कोमात गेल्यावर नायसने तिला रुग्णवाहिकेत एका खासगी रुग्णालयात नेलं, जिथे आई आणि नवजात बाळाला मृत घोषित करण्यात आलं.
advertisement
तिरुअनंतपुरम नगरपालिकेचे नगरसेवक यू दीपिका यांनी सांगितलं की, आरोपी नायस आपल्या पत्नीला आधुनिक उपचार देण्याच्या विरोधात होता. आशा कार्यकर्त्यांनी कुटुंबाशी संपर्क साधला असता नायसने त्यांना पत्नीला भेटू दिलं नाही. युट्युब व्हिडिओजच्या मदतीने आपल्या इतर मुलांचाही घरी जन्म झाल्याचा दावा त्याने केला आहे. या महिलेची यापूर्वी तीन प्रसूती झाली होती, सर्व सिझेरियन होत्या. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की नॉर्मल डिलिव्हरी शक्य नाही. पण नायसने आपल्या पत्नीला आधुनिक उपचार घेण्यास परवानगी दिली नाही. महिलेला रुग्णालयात जायचं होतं, पण तिला तिच्या नवऱ्याची भीती वाटत होती. जर तिने त्याचा निर्णय मान्य केला नाही तर तो तिला सोडून देईल, अशी धमकी आरोपीने दिली होती.
Location :
First Published :
Feb 22, 2024 7:43 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
ती विरोध करत होती पण पतीने ऐकलं नाही; स्वतः केली पत्नीची प्रसूती, घरभर रक्त अन् महिलेचा मृत्यू









