गुलाबाई या महिलेवर तिचा मुलगा राम यादव याने कुऱ्हाडीने हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की आईचा जागीच मृत्यू झाला. आईची हत्या करूनही मुलगा थांबला नाही, तर त्याने आईच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि त्यानंतर तो आईच्या मृतदेहाजवळ बसून गाणे म्हणू लागला.
याप्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. हत्येमुळे खोलीभर रक्त होते. नंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. पण, हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. सध्या आरोपी मुलाची चौकशी सुरू आहे.
advertisement
या प्रकरणात एसएसपी शशी मोहन सिंह म्हणाले की, आरोपीची मानसिक स्थिती सामान्य दिसत नाही. हत्येनंतर तो घटनास्थळी बसून गाणे गात होता. पोलीस तपासात हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास अधिकारी प्रत्येक बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत. छत्तीसगडच्या जशपूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मुलाविरोधात संतापाची लाट पसरली आहे.
