लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरातील बनशेळकी रोड येथे ही घटना घडली. यात प्रॉपर्टीच्या वादावरुन आरोपी सिद्धार्थ बनशेळकिकर याने त्याची आई संगीता बाबासाहेब बनशेळकीकर आणि मोठा भाऊ सचिन बनशेळकीकर यांच्यावर हल्ला केला. त्याने ऊस तोडण्याच्या कोयत्याने त्यांच्या डोक्यात वार केले होते. ही घटना 30 मे रोजी घडली होती.
जळगाव हादरलं! 3 वर्षाच्या सावत्र मुलीसोबत बापाचं धक्कादायक कृत्य, आईनेही दिली साथ
advertisement
या हल्ल्यात आरोपीची आई आणि भाऊ गंभीर जखमी झाले होते. दरम्यान संगीता बाबासाहेब बनशेळकीकर यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर 1 जूनला रात्री 1 वाजता संगीता बाबासाहेब बनशेळकीकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोटच्या मुलानेच आईची हत्या केल्यानं या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बापाकडून सावत्र मुलीची हत्या
जळगावमधूनही नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली. यात जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे सावत्र बापाने तीन वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेलसवाडी येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेने ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीची आई आणि सावत्र बापाविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
