बारावीची परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशीच आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्या प्रकरणी आमगाव पोलीस चौकशी करत आहे. कृष्णा धरम शिवनकर असे विद्यार्थ्याचे नाव आहे. बारावीच्या निकालानंतर तो मानसिक तणावात होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. घरात कुणीच नसताना त्याने दोराच्या साहाय्याने घरातच गळफास लावून आत्महत्या केली.
advertisement
आमगाव पोलीस करत आहे
नुकताच बारावीचा ऑनलाईन निकाल लागला असून त्यात बजरंग चौक आमगाव येथील राहणाऱ्याने विद्यार्थ्याने बारावीची परीक्षा दिली. मात्र या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला. त्यामुळे कृष्णाने आपले राहत्या घरी आज दुपारी दोन वाजता गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे आज कृष्णाचा वाढदिवस होता. आपल्या वाढ दिवशीच कृष्णाने गडफास लावून आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करुन पोस्टमार्टमकरता पाठवण्यात आला असून पुढील तपास आमगाव पोलीस करत आहे.
खचून जाऊ नका, आयुष्य दुसऱ्यांदा मिळत नाही
बारावीच्या परीक्षेत कमी गुण किंवा अपयश मिळाल्यानंतर विद्यार्थी खचून जातात. खरं तर आयुष्यात यश आणि अपयश येतंच पण त्यामुळे खचून जाऊ नका. कारण आयुष्यात स्वताला सिध्द करण्याची संधी तुम्हाला दुसऱ्यांदा मिळते. पण आयुष्य दुसऱ्यांदा मिळत नाही. 19 वर्षाच्या भावेशनं ऐन उमेदीच्या काळात आयुष्य संपवलं.