पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मस्ती करत असलेल्या मुलांना शांत करण्यासाठी शिक्षकांनी छडी फेकून मारली, ही छडी चुकून यशवंतच्या उजव्या डोळ्याला लागली. सुरूवातीला यशवंतच्या पालकांना त्याची दुखापत इतका काळ टिकेल, असं वाटलं नव्हतं. काही दिवसांनी यशवंतची प्रकृती बिघडली, तेव्हा पालकांनी त्याला चिंतामणीमधील नेत्ररोग तज्ज्ञांकडे नेलं. इथल्या डॉक्टरांनी यशवंतला जिल्हा रुग्णालयात जायला सांगितलं.
advertisement
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या डोळ्याची तपासणी केल्यानंतर, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बंगळुरूमधील व्हिक्टोरिया रुग्णालयात त्याच्यावर दोनदा शस्त्रक्रिया केल्या गेल्या, पण त्यानंतरही यशवंतच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. यानंतर पालकांनी यशवंतला बंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात नेलं, तिथे यशवंतच्या उजव्या डोळ्याची दृष्टी गेल्याचं निष्पन्न झालं.
यानंतर, रविवारी संध्याकाळी पालक आणि स्थानिकांनी बाटलाहल्ली पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली, त्यानंतर या घटनेसंदर्भात आरोपी शिक्षक आणि ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्यांसह इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'पालकांच्या तक्रारीच्या आधारे, आम्ही भारतीय न्याय संहिता आणि बाल न्याय कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.'