महिलेची फसवणूक झाल्यानंतर या महिलेने आता पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मुंबईतील काही जणांनी तिची 8 लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम 406 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले की, 2022 मध्ये एका व्हॉट्सअॅप न्यूज पेपर ग्रुपमध्ये जाहिरात आली होती. या जाहिरातीमध्ये टीव्ही मालिकेसाठी चांगल्या कलाकारांची गरज आहे. इच्छुकांनी दिलेल्या हॉटेलजवळ व्यक्तिगत रुपाने संपर्क करावे, असे सांगितले होते. ही जाहिरात पाहिल्यावर ही शिक्षिका त्याठिकाणी जून 2022 मध्ये गेली.
advertisement
याठिकाणी सोनम उर्फ शगुफ्ता आणि माही उर्फ शाइन यांनी तिची ऑडिशन घेतली. यानंतर तिच्याकडून एक फॉर्म भरवून घेत 20 हजार रुपयांची मागणी केली. तिने 20 हजार रुपये रोख दिले. यानंतर तिच्याशी कुठलाही संपर्क करण्यात आला नाही.
यानंतर तुमचे काम चांगले आहे आणि काही दिवसात आम्ही राजकोटला येऊ तेव्हा तुमच्याशी संपर्क करू सांगण्यात आले. यानंतर काही कालावधीनंतर दोन्ही महिला राजकोटला आला. याठिकाणी अरमान अलीनेही महिलेची मुलाखत घेतली. तसेच एक नवीन टिव्ही मालिका प्रोजक्ट आणला असून तुला लवकरच काम देऊ, असे सांगितले. यानंतर तिच्याकडून 18 हजार रुपये रोख रक्कम घेतली आणि तिने कॅम्पस की दुनिया नावाच्या वेब सीरिजच्या शुटिंगमध्ये भागही घेतला. यानंतर तिला एका टीव्ही मालिकेत काम देतील असे भुषण सरांशी तुझी भेट घालून देण्यात येईल, असे तिला सांगण्यात आले.
पायलट तरुणीची आत्महत्या, कुटुंबीयांनी प्रियकरावर केले गंभीर आरोप, म्हणाले, तो...
महिलने भूषण यांच्याशी संपर्क केला असता, मी एक नवीन टीव्ही मालिका बनवत आहे आणि तुमची निवड केली जाईल, असे सांगण्यात आले. यानंतर महिलेकडे 70 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ही रक्कम या महिलेने दिली. तसेच सलमान खानच्या चित्रपटांमध्ये काम करण्याचे आमिष देऊन तिच्याकडून 5 लाख 62 हजार रुपये रोख आणि गुगलपेच्या माध्यमातून घेण्यात आले.
यानंतर महिलेने सातत्याने त्यांच्याशी संपर्क केली. मात्र, वर्षभरानंतरही तिला कुठलेही काम देण्यासाठी बोलवण्यात आले नाही. जेव्हा शूटिंगची तारीख येईल, तेव्हा तुम्हाला सांगितले जाईल. मात्र, जून 2024 नंतर सर्वांचे फोन बंद येऊ लागले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी या शिक्षिकेने पोलिसात तक्रार केली असून पोलीस आता या टोळीचा शोध घेत आहेत.