अमेरिकन तपास यंत्रणा एफबीआयच्या विशेष अधिकारी अल्थिया डंकन यांनी या संपूर्ण हल्ल्याचा तपास सुरू झाला असल्याची माहिती दिली आहे. घटनास्थळावरून आम्हाला आयईडी मिळालं आहे, ज्यामुळे चिंता वाढली आहे. हल्लेखोर आयईडी स्वत:सोबत घेऊन आले होते का आयईडी तिकडेच पडून होतं? याचा तपास एफबीआय करत आहे. हल्ला झाला ते ठिकाण सुरक्षित झोन आहे, तसंच इकडे फुटबॉल स्टेडियमही आहे, जिकडे मॅच बघण्यासाठी हजारो लोक येतात. या भागात राहणाऱ्या लोकांनाही घरातच थांबण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
advertisement
व्हिडिओमध्ये दिसला रोबोट
घटनास्थळी एकच आयईडी होता का एक पेक्षा जास्त? या प्रश्नावर अल्थिया डंकन यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. काही उपकरणं मिळाली आहेत, जी चिंता वाढवणारी आहेत, असं उत्तर अल्थिया डंकन यांनी दिलं. सीएनएनच्या डब्ल्यूडीएसयूच्या व्हिडिओमध्ये एक रोबोट कारच्या खाली जाताना दिसला आहे, पोलीस याचाही तपास करत आहेत.
काही वेळातच होती मॅच
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. हा भाग न्यू ऑरलियन्सच्या फ्रेंच क्वार्टरमधील लोकप्रिय ठिकाण आहे. नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बरेच लोक इकडे आले होते. काही वेळातच इथल्या शुगर बाऊल कॉलेज अमेरिकन फुटबॉल मॅच होणार होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात करण्यात आली होती. या कारणामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
