नागपूर : आईच्या उपचारासाठी पैसे नसल्याने काय करायचे या विचारातून चोरीचा मार्ग पत्करला. आजारी आईच्या उपचारासाठी न्यायालयाच्या फौजदारी विभागातील महिला लिपिकाच्या कार्यालयात चोरी केल्याची घटना घडली आहे. कळमेश्वर येथील एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
आईच्या उपचारासाठी पैसे नव्हते मात्र उपचार करणे आवश्यक होते, त्यासाठी लिपिकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने न्यायालयाच्या फौजदारी विभागातील महिला लिपिकाच्या कार्यालयात ठेवलेल्या बॅगमधून 35 हजार रुपयांची चोरी करण्यात आले. कळमेश्वर येथील एका अस्थायी कर्मचाऱ्याला सदर पोलिसांनी अटक केली आहे. प्रणय थोरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
advertisement
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी कैद
रोहिणी वाडीभस्मे या फौजदारी विभागात लिपिक आहेत. संध्याकाळीच्या दरम्यान वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश यांच्या चेंबरमध्ये त्या गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांची पर्स विभागातच होती. परत आल्यावर त्यांना पर्सची चेन उघडी आढळली. त्यात ठेवलेले 35 हजार रुपये गायब होते. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी प्रणय थोरात पैसे चोरताना दिसला. प्रणय हा एक अस्थायी कर्मचारी असून, तो ड्युटी नसतानाही कार्यालयात आला होता. एक अस्थायी कर्मचारी असून तो ड्युटी नसतानाही कार्यालयात आला होता.
उपचारासाठी पैसे चोरल्याची कबुली
वाडीभस्मे यांच्या तक्रारीवरून सदर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. आजारी आईच्या उपचारासाठी पैसे चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीची रक्कम जप्त करण्यात आली आहे.