'उशिरा का आलीस?' म्हणून सुरू झाला वाद
अनुसया वाघमारे या पती रामा वाघमारे यांच्यासोबत वांगी येथे खोपी (झोपडी) घालून राहत होत्या. कोळसा तयार करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. 6 ऑगस्ट रोजी पहाटे अनुसया मृतावस्थेत आढळल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत, पती रामा वाघमारेने मंगळवारी रात्री 7 वाजता खोपीत पत्नी अनुसयाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचे समोर आले. या मारहाणीतच तिचा मृत्यू झाला. अनुसयाच्या अंगावर मारहाणीच्या जखमा स्पष्ट दिसत होत्या. पोलिसांनी मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले. या प्रकरणी प्रकाश पवार यांच्या तक्रारीवरून रामा वाघमारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
मुलामुळे उघडकीस आले कृत्य
हा प्रकार उघडकीस कसा आला, याबद्दलही माहिती समोर आली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता अनुसया आणि रामा हे दोघेही वझुर येथे बाजार करण्यासाठी गेले होते. बाजार आटपल्यानंतर 'तू पुढे जा' असे सांगून रामा वझुर येथेच थांबला होता. सायंकाळी 5 वाजता तो खोपीत परत आल्यावर त्याला पत्नी दिसली नाही. त्यानंतर रात्री 7 वाजता अनुसया परत आल्यावर 'उशिरा का आलीस?' असे म्हणून रामा रागाच्या भरात तिच्यासोबत भांडण करू लागला आणि तिला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली.
या मारहाणीनंतर अनुसया जमिनीवर निपचित पडली होती. आई काहीच हालचाल करत नसल्याचे पाहून मुलगा रोशन याने शेजाऱ्यांना सांगितले, तेव्हा हा क्रूर प्रकार उघडकीस आला.
हे ही वाचा : नियतीचा अजब खेळ! 5 वर्षांचा संसार, 2 मुलांची आई... पण अल्पवयीन; दुसऱ्यांदा बाप होणाऱ्या पतीवर 'पोक्सो'चा गुन्हा
हे ही वाचा : 1.80 लाख देऊन केले लग्न; टोळीने नवऱ्याच्या गाडीवर हल्ला, 35000 बॅग घेऊन नवरीने ठोकली धूम!