याबाबत मिळालेली माहिती अशी की, लग्नानंतर काही महिन्यातच पतीने पत्नीचा छळ सुरू केला. तिला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगितले. इतर महिलांना घरी आणून त्यांच्याशी अश्लील चाळे करत असे. सासू सासऱ्यांनीसुद्धा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप विवाहितेने केला. पुण्यात हा सर्व प्रकार घडला असल्याचं तक्रारीत म्हटलंय.
लग्नावेळी पतीला सात तोळे सोने आणि इतर साहित्य दिलं होतं. तसंच लग्नाला आलेल्या नातेवाईकांना राहण्यासाठी हॉटेल बूक करण्यात आलं होतं. लग्नानंतर काही महिने व्यवस्थित गेले. पण त्यानंतर पती दारू पिऊन यायला लागला. दारुच्या नशेत मारहाण करण्यास सुरवात झाली. पतीने २०१९ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतरही पत्नीला मारहाण केली गेली. आता तिला पतीसह सासरच्या लोकांनी घरातून बाहेर काढलं. यानंतर पत्नीने तिच्या माहेरी गेल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पतीसह सासू, सासरा, दीर आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
advertisement
