अमेठीमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. जगदीशपूर परिसरातील कचनाव गावात पती-पत्नीमधील वाद इतका वाढला की दुसऱ्या पत्नीने तिच्या पतीवर हल्ला केला. समोर आलेल्या माहितीनुसार, अन्सार अहमदचे दोन लग्न झाले होते. त्याची पहिली पत्नी सबितुल इतौजा ही अयोध्या जिल्ह्यातील रहिवासी आहे. दुसरी पत्नी नाजनीन बानो ही जगदीशपूर पोलीस स्टेशनच्या हरिमौ येथील रहिवासी आहे. दोन लग्नांमुळे घरात वारंवार वाद होत असत.
advertisement
पहाटेच्या सुमारास साधला डाव...
नाजनीन रात्री उशिरा घरी पोहोचली आणि पुन्हा एकदा वाद सुरू झाला. पहाटे 3 वाजताच्या सुमारास नाजनीनने अन्सारला गुंगी देणारे पदार्थ दिला. तो बेशुद्ध पडू लागल्यावर तिने त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्याचे गुप्तांग कापले. या हल्ल्यानंतर ती पळून जाऊ लागली. मात्र, कुटुंबातील सदस्यांनी पळून जाणाऱ्या नाजनीनचा बराच अंतर पाठलाग केला. मात्र, ती त्यांच्या हाती लागली नाही आणि पसार झाली.
कुटुंबाने गंभीर जखमी झालेल्या अन्सारला जगदीशपूर ट्रॉमा सेंटरमध्ये नेले. तेथून त्याची गंभीर प्रकृती पाहून त्याला एम्स रायबरेली येथे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी नाजनीनला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. एसएचओ राघवेंद्र यादव यांनी सांगितले की, आरोपी पत्नीची चौकशी केली जात आहे आणि या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जात आहे.
पहिल्या पत्नीच्या आग्रहावरून दुसरं लग्न....
अन्सारने या वर्षी मार्चमध्ये त्याची दुसरी पत्नी नाजनीनशी लग्न केले. त्याचे पहिले लग्न 14 वर्षांपूर्वी झाले होते. परंतु त्याला मुलं नसल्याने त्याने पहिल्या पत्नीच्या आग्रहावरून दुसरे लग्न केले. लग्नानंतर नाजनीनने त्याच्या पहिल्या पत्नीवर घटस्फोट घेण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. मात्र, हे लग्न पहिल्या पत्नीच्या इच्छेनुसार झाले असल्याने तो तिला घटस्फोट देणार नसल्याचे अन्सारने स्पष्ट केले. या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद झाला.
दोन्ही पत्नींपासून त्याला मुले नव्हती. अन्सारी परदेशात नोकरी करतो. ही हल्ल्याची घटना घडली. त्यावेळी त्याची पहिली पत्नी तिच्या माहेरी होती. घटनेदरम्यान, घरात उपस्थित असलेल्या इतर कुटुंबातील सदस्यांनी अन्सारीला ताबडतोब जगदीशपूर ट्रॉमा सेंटरमध्ये नेले.