तो ट्रकचालका 700km गेला होता पळून
महामार्गावर अपघाताचा दुर्दैवी घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या घटनेंतर नागपूर ग्रामीण पोलीस खडबडून जागे झाले होते. पोलिसही आरोपीच्या शोधात होते. हा आरोपी 700 किलोमीटर दूर पळून गेला होता. सत्यपाल राजेंद्र (वय-28) हा मूळचा उत्तरप्रदेशातील राहणारा आहे. पोलिसांनी AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मार्वेलच्या मदतीने पळून गेलेल्या ट्रकचालकाला पकडले आहे.
advertisement
...अशी घडली होती भयानक घटना
सहा-सात दिवसांपूर्वी या अपघातात ग्यारसी अमित यादव (वय-31. लोणार, पोस्ट गुमती, जि. नागपूर) येथे राहणाऱ्या होत्या. त्या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाने दुचाकीवरून देवलापारमार्गे करणपूरला निघाल्या होत्या. पण सत्यपाल राजेंद्र या ट्रक चालकाने त्यांच्या दुचाकीला कट मारला आणि ट्रकच्या चाकाखाली ग्यारसी आल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातावेळी महामार्गावर पत्नीच्या मृत्यूनंतर पतीच्या मदतीला कुणीच आलं नाही. दुर्दैवाने पतीला पत्नीचा मृतदेह गाडीला बांधून घरी न्यावे लागले होते.
हे ही वाचा : चोरीचा प्रयत्न फसला; एक चोर सापडला, तर दुसरा चौथ्या मजल्यावरून पडला, साताऱ्यात घरफोडीचा थरार 'असा' घडला!
हे ही वाचा : 'पत्नी सोबत राहू देत नाही', पतीने पोलीस ठाण्यासमोरच कापली हाताची नस, हा प्रकार पाहून...
