ग्लॉस्टरशायर इथं राहणारी 56 वर्षांची अमांडा विक्सन, जिच्या घरी 25 वर्षांपूर्वी तिच्या मैत्रिणीची मुलगी एकटीच आली होती. पण तिने तिला पुन्हा जाऊच दिलं नाही आपल्याच घरात ठेवलं, ठेवलं काय कैद केलं, तब्बल 25 वर्षे तिने तिला घरातून बाहेरही पडू दिलं नाही. इतकी वर्षे महिलेने तिच्यासोबत जे केलं त्याची कल्पनाही कुणी केली नसेल.
advertisement
डॉगसोबत रूममध्ये एकटाच होता मुलगा, येऊ लागला विचित्र आवाज; दरवाजा उघडताच किंचाळली आई
अमांडाला 10 मुलं होती. त्यामुळे तिने मैत्रिणीच्या मुलीला तिच्या घरात मोलकरीण म्हणून ठेवलं. जेणेकरून ती तिच्या मुलांची काळजी घेईल. त्यानंतर तिच्यासोबत नको नको तेच केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमांडाच्याच एका मुलाने गुप्तपणे पोलिसांना मुलीबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस तिला वाचवण्यासाठी आले.
मुलगी खूपच वाईट स्थितीत होती. तिची अवस्था पाहून पोलीसही शॉक झाले. तिला आंघोळ करून एक वर्ष झालं होतं. ती खूप बारीक झाली होती, तिचा बेड पूर्णपणे घाणेरडा होता. अमांडा तिला दररोज झाडूने मारहाण करायची, तिच्या तोंडात साबणाचे पाणी ओतायची आणि चेहऱ्यावर ब्लीच लावायची, तिने तिचे दात तोडले, तिच्या मर्जीशिवाय तिचं मुंडणही केलं, डोक्यावरील सगळे केस काढून टाकले.
Shocking! महिलेच्या 18 सेकंदाच्या Video ने घेतला पुरुषाचा जीव, प्रकरण काय?
न्यायालयाला सांगण्यात आलं की मुलीने बाहेर जाऊ नये म्हणून सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करण्यात तर अमांडाच्या वकिलाने सांगितले की ती मुलगी स्वतः तिचं वाईट कुटुंब सोडून अमांडाकडे आली होती आणि तिने ही संपूर्ण कहाणी रचली होती.
1995 ते 2021 सालातील ही घटना आहे. ही मुलगी आता 40 वर्षांची झाली आहे आणि पोलिसांनी तिची सुटका केली आहे. अमांडावर जबरदस्तीने काम करायला लावणं, बंदिवासात ठेवणं आणि छळ करणं असे आरोप करण्यात आले आहेत. डेली स्टार आणि स्काय न्यूजमधील वृत्तानुसार, अमांडाला सध्या सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणावर मार्चमध्ये सुनावणी होणार आहे, तेव्हा तिला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
