Shocking! महिलेच्या 18 सेकंदाच्या Video ने घेतला पुरुषाचा जीव, प्रकरण काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Man End Life After Video Viral On Social Media : गेल्या दोन दिवसांपासून तो तीव्र ताणतणाव आणि मानसिक दबावाखाली होता. म्हणून त्याने आपलं आयुष्य संपवलं. याला कारणीभूत होता तो 16 जानेवारी रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेला फक्त 18 सेकंदाचा व्हिडीओ.
सोशल मीडियावर कितीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ माहितीपूर्ण, काही मजेशीर, काही विचित्र, काही धोकादायकही असतात. असाच सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ. एका महिलेचा हा व्हिडीओ ज्यामुळे एका पुरुषाचा जीव गेला आहे. महिलेचा फक्त 18 सेकंदाचा व्हिडीओ पुरुषाच्या मृत्यू कारणीभूत ठरला आहे.
केरळच्या कोझिकोडमधील ही हृदयद्रावक घटना आहे. एका महिलेच्या व्हायरल व्हिडिओमुळे 42 वर्षीय पुरूषाने आपलं आयुष्य संपवलं आहे. गोविंदपुरम परिसरातील हे प्रकरण. एका खाजगी कंपनीत काम करणारा सेल्स मॅनेजर दीपक 18 जानेवारी 2026 रोजी त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला. केरळ पोलिसांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून तो तीव्र ताणतणाव आणि मानसिक दबावाखाली होता. म्हणून त्याने आपलं आयुष्य संपवलं. याला कारणीभूत होता तो 16 जानेवारी रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेला फक्त 18 सेकंदाचा व्हिडीओ.
advertisement
हा व्हिडिओ शिमजिता मुस्तफा नावाच्या महिलेने रेकॉर्ड केला आणि ऑनलाइन अपलोड केला. तिने आरोप केला की दीपकने पय्यानूरला जाणाऱ्या बस प्रवासादरम्यान तिचा विनयभंग केला आणि तिला त्रास दिला. या व्हिडिओमध्ये एका महिलेने बस प्रवासादरम्यान तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी सत्य न तपासताच दीपकला ट्रोल करायला त्याच्यावर अश्लील कमेंट करायला सुरुवात केली. सगळ्यांसमोर बदनामी आणि चारित्र्यहननामुळे दीपक इतका निराश झाला की त्याने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला.
advertisement
दीपकच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाने जिल्हा पोलीस प्रमुखांशी संपर्क साधला आणि हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा असून तो फक्त प्रसिद्धीसाठी बनवल्याचा आरोप केला. कुटुंबाच्या तक्रारीनंतर मेडिकल कॉलेज पोलिसांनी शिमजिता मुस्तफाविरुद्ध आयपीसी कलम 108 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
केरळ राज्य मानवाधिकार आयोगानेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने उत्तर विभागाच्या पोलीस उपमहानिरीक्षकांना या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत आणि आयोगाने आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल पोलिसांकडून एका आठवड्यात मागितला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 फेब्रुवारी रोजी कोझिकोड इथं होणार आहे.
advertisement
पोलीस सूत्रांचं असंही म्हणणं आहे की सुरुवातीच्या तपासात व्हिडिओ आणि महिलेच्या दाव्यांमध्ये अनेक विरोधाभास दिसून येतात. 16 जानेवारी रोजी घरी परतल्यापासून दीपक मौन बाळगून होता. त्याने त्याच्या काही जवळच्या मित्रांना सांगितलं होतं की तो निर्दोष आहे आणि व्हिडिओमध्ये जे दाखवलं जात आहे ते खरं नाही. पण तोपर्यंत व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला होता.
advertisement
आरोपी महिला शिमजिता आता पोलिसांच्या चौकशीत आहे. तिने दीपकला फसवण्यासाठी जाणूनबुजून व्हिडिओ रेकॉर्ड केला का याचा तपास ते करत आहेत. जर न्यायालयात चिथावणीखोरीचा आरोप सिद्ध झाला तर महिलेला दीर्घ तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आली आहे का हे निश्चित करण्यासाठी पोलीस मोबाईल फोन आणि व्हिडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी देखील करत आहेत.
Location :
Kerala
First Published :
Jan 22, 2026 2:15 PM IST









