डॉगसोबत रूममध्ये एकटाच होता मुलगा, येऊ लागला विचित्र आवाज; दरवाजा उघडताच किंचाळली आई
- Published by:Priya Lad
Last Updated:
Child And Dog Video : डॉग आणि लहान मुलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलाने श्वानासोबत जे केलं ते पाहून आईही शॉक झाली आहे.
आता कित्येक लोक डॉग पाळतात. लहान मुलांना प्राण्यांची आवड असते. त्यामुळे कित्येक पालक आपल्या मुलांसाठी डॉगी खरेदी करू आणतात आणि मुलं त्यांच्यासोबत खेळतात. असाच एका लहान मुलाचा आणि कुत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या मुलाने कुत्र्यासोबत जे केलं ते पाहून आईलाही मोठा धक्का बसला आहे.
एका रुममध्ये हा एकटा मुलगा डॉगसोबत होता. खोलीतून विचित्र आवाज येत होता. तो ऐकून आई त्या रूमच्या दिशेने गेली. तिने दरवाजा उघडून पाहिलं आणि ती पुरती हादरलीच. ती मोठ्याने ओरडली. असं या खोलीत काय होतं हे पाहण्याची उत्सुकता आता तुम्हालाही असेल.
advertisement
मुलाच्या हातात इलेक्ट्रिक रेझर होता. मुलाने कुत्र्यासोबत जे केलं होतं, त्याची कल्पनाही कुणी केली नसेल. कुत्र्याच्या डोक्यावर केसच नव्हते. मुलाने कुत्र्याच्या डोक्यावरील केस रेझरने काढून टाकले होते. हे पाहून आई आधी शॉक झाली पण नंतर तिला हसूही आवरलं नाही. डॉगच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे आहेत.
advertisement
दरम्यान या व्हिडीओवर अनेक कमेंट आल्या आहेत. काहींनी आपल्या बालपणीच्या आठवणी परत आल्याचं म्हटलं तर काहींना त्या कुत्र्याची द्या आली आहे. तर काहींनी मुलांच्या हातात इलेक्ट्रिक रेझरसारख्या वस्तू देऊ नका, धोकादायक ठरू शकतं, असं सांगत चिंता व्यक्त केली आहे.
Location :
Delhi
First Published :
Jan 22, 2026 7:31 AM IST
मराठी बातम्या/Viral/
डॉगसोबत रूममध्ये एकटाच होता मुलगा, येऊ लागला विचित्र आवाज; दरवाजा उघडताच किंचाळली आई









