मनिषा चौधरी असं मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. त्या संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड-फुलंब्री मार्गावर असणाऱ्या चिंचखेडा गावच्या रहिवासी आहेत. त्या आपल्या खासगी कामासाठी छत्रपती संभाजीनगरला गेल्या होत्या. घटनेच्या दिवशी शुक्रवारी त्यांचा मुलगा ऋषीकेश चौधरी त्यांना घेण्यासाठी संभाजीनगरला गेला होता. दोघंही दुचाकीने आपल्या गावी परत येत होते.
सिल्लोड-फुलंब्री रस्त्यावरून जात असताना मायलेकासोबत मोठा अनर्थ घडला. यावेळी मनिषा यांच्या साडीचा पद दुचाकीच्या चेनमध्ये अडकला आणि काही कळायच्या आतच त्या रस्त्यावर मागच्या बाजुने पडल्या. दुचाकी काहीशी वेगात असल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन मुलाच्या डोळ्यादेखत आईचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच बडोद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघाती निधनाची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. गावापासून काही अंतरावरच अशाप्रकारे मनिषा यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत मुलगा ऋषीकेशही जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.