अहमदाबाद येथील गुन्हे शाखेने मेहसाणा येथील 2 जणांना याप्रकरणी अटक केली. यामध्ये एक व्यक्ती हा 54 वर्षांचा असून सारसपुर येथील रहिवासी आहे. तर एक तरुणी 24 वर्षांची असून चांदलोढिया येथील रहिवासी आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी आरोपींनी मॅट्रिमोनियल चालवत असल्याचा दावा करत पीडित व्यक्तीसोबत त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी फोन केला होता आणि त्यांना अनेक तरुणींचे फोटोही पाठवले होते. यापैकी एका तरुणीने तक्रारदार म्हणजे वराच्या आई वडिलांशी संपर्क केला होता.
advertisement
मजुरीच्या बदल्यात मिळत होती दारू, एक दिवस पैसे मागितले तर घडलं मोठं कांड
तरुणीने तरुणासोबत बोलण्यासाठी फोन केला होता. तक्रारदार आपल्या मुलासाठी स्थळ शोध होता. या तरुणीने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या तरुणीने मेहसाणा येथील या तरुणाला एकटाच ये असे सांगत अडालज येथील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. यानंतर तरुण तिला भेटायला गेला. तेथे दोघांनी शारीरिक संबंधही ठेवले. मात्र, शारीरिक संबंध ठेवल्यावर तिने त्या तरुणाला त्यांच्या भेटीचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे सांगितले आणि हा व्हिडिओ त्याच्या कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. तसेच जर 2 लाख रुपये नाही दिले तर हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकेन आणि बलात्काराच्या केसमध्येही फसवेन, अशी धमकी दिली. 2 लाख रुपयांनंतर आरोपींनी 5 लाख रुपयांची मागणी केली.
यानंतर या तरुणाने आपल्या आई वडिलांना या घटनेची माहिती दिली आणि त्यांनी गांधीनगरच्या अडालज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी गुप्त सूचनेच्या आधाराव कार्यवाही करत अहमदाबादच्या गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना अटक केली. तसेच त्यांना अडालज पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.