न्यूयॉर्क मेट्रोमध्ये ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी ब्रुकलिन ब्रिज-सिटी हॉल स्टेशनवर घडली. मेट्रोला स्टेशनवर नेहमी सारखी गर्दी होती. जॉन शेल्डन (वय 38) असं मृताचं नाव आहे. जॉन हे ब्रुकलिन इथं राहणार होते. नेहमी प्रमाणे जॉन हे मेट्रोने प्रवास करण्यासाठी पोहोचले. सकाळी ८:३० च्या सुमारास जॉन मेट्रो ट्रेन क्रमांक ५ ने प्रवास करत होते. या दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या बुटांवर पाय ठेवला. या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद इतका टोकाला गेला की, आरोपीने मेट्रोमध्येच जॉनवर चाकूने हल्ला केला. जेव्हा सबवे ब्रुकलिन ब्रिज-सिटी हॉल स्टेशनवर थांबला तेव्हा दोघेही उतरले, जिथे आरोपींनी पुन्हा जॉन यांच्यावर हल्ला केला.
advertisement
मेट्रो स्टेशनवर सोडला जीव
स्टेशनवर उपस्थितीत असलेल्या लोकांनी तातडीने 911 वर पोलिसांना फोन केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. जॉन हे मेट्रो स्टेशनवर बेशुद्ध पडलेले होते. त्यांच्या शरीरावर चाकूचे अनेक वार होते. त्यांना तातडीने बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण जिथे डॉक्टरांनी जॉनला तपासून मृत घोषित केलं. घटनेनंतर, काळे कपडे घातलेला आणि काळे हेडफोन घातलेला आरोपी पळून गेला. दोघांमध्ये पूर्वीपासून कोणतीही ओळख नव्हती. हे फक्त दोन अनोळखी लोकांमधील भांडण होतं. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेबाबत मेट्रोच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
