TRENDING:

mobile cyber fraud : तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो, पोलिसांनी दिला हा महत्त्वाचा इशारा

Last Updated:

cyber crime - सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. हे युग डिजिटल युग म्हटले जाते. मात्र, या डिजिटल युगात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यातच आता सायबर पोलिसांनी महत्त्वाचा इशारा दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हेमंत ललवाणी, प्रतिनिधी
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

जोधपुर - सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. हे युग डिजिटल युग म्हटले जाते. मात्र, या डिजिटल युगात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यातच आता सायबर पोलिसांनी महत्त्वाचा इशारा दिला आहे.

सायबर गुन्हेगारांना फसवणुकीच्या नवीन पद्धत सापडली आहे. हे सायबर गुन्हेगार लग्नाची निमंत्रण पत्रिका व्हॉट्सअप पाठवतात. एपीके फॉरमॅटमध्ये ही निमंत्रण पत्रिका असते. मात्र, ही निमंत्रण पत्रिका डाऊनलोड करताच तुमचा मोबाईल हॅक होऊन जातो.

advertisement

जोधपुरचे सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि एडीसीपी पुष्पेंद्र सिंह आणि सायबर तज्ज्ञ अंकित चौधरी यांनी आतापर्यंत 15 हजारांहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना सायबर फ्रॉड टाळण्यासाठी, हा सर्व प्रकार ओळखता यावा यासाठी सायबर प्रशिक्षण दिले आहे. या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला.

सध्या लगीनसराई सुरू झाली असून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आणि 2025 च्या सुरुवातीला लाखो विवाहसोहळे भारतात होतील. एका अहवालानुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तब्बल 35 लाख लग्ने भारतात होणार आहेत. लगीनसराई सुरू झाल्याने सायबर गुन्हेगारांनीही नवीन युक्ती शोधली असून आता ते व्हॉट्सअपचा सहारा घेत आहेत. लोकांच्या फसवणुकीसाठी ते लग्नाची निमंत्रण पत्रिका पाठवून लोकांना मूर्ख बनवत आहेत.

advertisement

काय काळजी घ्यावी -

सायबर गुन्हेगार हे लग्नाची निमंत्रण पत्रिका व्हॉट्सअप डिजिटल एपीके फाइल्स स्वरुपात पाठवतात. ही फाईल अगदी लग्नपत्रिकेसारखी दिसते. मात्र, यावर क्लिक करताच ही फाइल तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होते. ही फाइल तुमचा सर्व डाटा चोरुन घेते आणि स्कॅमर्सला पाठवते आणि अशा पद्धतीने तुमचा फोन हॅक होऊन तुमची आर्थिक फसवणुक केली जाते. त्यामुळे सतर्क होण्याची गरज आहे.

advertisement

75 वर्षांच्या नवऱ्याचा 70 वर्षांच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय, मध्यरात्री शीरच धडावेगळं केलं

अशा पद्धतीने सामान्य व्यक्ती लग्नाची निमित्रण पत्रिका पाठवत नाहीत. अशा लिंक्सवर क्लिक करण्यापूर्वी पूर्ण चौकशी करावी. ही फाइल तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्यात एक व्हायरस असतो. हा व्हायरस तुमच्या संपूर्ण फोनवर नियंत्रण मिळवतो. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होते. फोन अपडेट ठेवा आणि फोनमध्ये अँटीव्हायरस ठेवा. जर ते डाउनलोड केले असेल किंवा अशी कोणतीही घटना घडल्यास ताबडतोब सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक 1930 वर कॉल करा आणि व्यवहार थांबवा आणि नंतर कारवाई करा. जर पैसे होल्ड केले गेले तर पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. यातूनच संरक्षण मिळू शकते.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
mobile cyber fraud : तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो, पोलिसांनी दिला हा महत्त्वाचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल