75 वर्षांच्या नवऱ्याचा 70 वर्षांच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय, मध्यरात्री शीरच धडावेगळं केलं

Last Updated:

crime news - मिळालेल्या माहितीनुसार, खूबचंद साहू (75) आणि पत्नी सदा रानी साहू (70) यांच्या घरी रात्री भजन झाले होते. रात्री 1 वाजेपर्यंत हे भजन चालले. तोपर्यंत दोन्ही सोबत होते.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
अनुज गौतम, प्रतिनिधी
सागर - गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधांच्या संशयावरुन पत्नी पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. तसेच यामुळे पती पत्नीत वाद होऊन हा वाद टोकाला जाऊन हत्येच्याही घटना घडत असताना दिसत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
75 वर्षांच्या पतीने आपल्या 70 वर्षांच्या पत्नीवर संशय घेत धारधार शस्त्राने तिची हत्या केली. मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पतीने शीर धडापासून वेगळे केले आणि आपल्या सोबत घेऊन गेला. यानतंर एका टेकडीवरील झाडावर ते शीर लटकावून तो फरार झाला. राहतगढ पोलीस ठाणे हद्दीतील टेहरा टिहरी गावात ही घटना घडली. खूबचंद साहू (75) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर सदा रानी साहू (70) असे मृत पत्नीचे नाव आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, खूबचंद साहू (75) आणि पत्नी सदा रानी साहू (70) यांच्या घरी रात्री भजन झाले होते. रात्री 1 वाजेपर्यंत हे भजन चालले. तोपर्यंत दोन्ही सोबत होते. मात्र, सकाळी खूबचंदची पत्नी त्यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. यानंतर त्यांच्या मुलाला आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी महिलेचे शीर धडापासून गायब होते. पतीचा शोध सुरू झाला होता. श्वानपथक पोलिसांना जंगल आणि टेकडीकडे घेऊन गेले. त्याठिकाणी एका झाडावर 6 फुट उंचीवर महिलेचे शीर लटकवल्याचे आढळून आले.
advertisement
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खूबचंदला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत भजन चालल्यावर दोघांमध्ये वाद झाला असेल. यातून खूबचंदने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली असेल, असे सांगण्यात येत आहे. तर आई वडिलांमध्ये नेहमी भांडणे व्हायची. त्यामुळे वडिलांनी आईची हत्या केली आणि ते फरार झाले, असे मृत महिलेचा मुलगा लाडले साहू याने सांगितले. दरम्यान, या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या/क्राइम/
75 वर्षांच्या नवऱ्याचा 70 वर्षांच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय, मध्यरात्री शीरच धडावेगळं केलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement