42 वर्षांच्या पुरुषासोबत 19 वर्षांच्या तरुणीनं केलं लव्ह मॅरेज, कुटुंबीयांचा विरोध, घडलं भयानक

Last Updated:

crime news - रक्षिताने दीड वर्षांनी मंजनाथसोबत प्रेम केले. मात्र, त्याचे चारित्र्य चांगले नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा विरोध केला. मात्र, रक्षिताने कुटुंबीयांचे काहीही न ऐकता त्याच्यासोबत लग्न केले.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
चित्रदुर्ग : गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने लव्ह मॅरेज केल्याने तिच्या कुटुंबीयांनी एका तरुणावर दगडाने, काठीने वार करत त्याची हत्या केली. या घटनेत आता आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत.
ही घटना कर्नाटकाच्या चित्रदुर्गच्या कोनानूर गावात घडली. 42 वर्षांच्या मंजनाथ आणि 19 वर्षांच्या रक्षितावर हल्ला केल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मंजनाथ आणि रक्षिता हे एक विवाहित दाम्पत्य होते. त्यांनी 3 महिन्यांपूर्वी एका मंदिरात लग्न केले होते. मात्र, या लग्नाला रक्षिताच्या कुटुंबीयांनी विरोध केला होता.
रक्षित्या आई वडिलांसह एकूण 20 पेक्षा जास्त जणांनी मंजनाथवर हल्ला केला होता. मंजनाथ काल दुपारीच गावी आला होता. लग्नानंतर मंजनाथ आपल्या गावी पहिल्यांदाच आला होता. यावेळी त्याच्यावर दगड आणि लाठीने वार करण्यात आले. हत्येनंतर आरोपी फरार झाले. रक्षिताचे वडील जगदीश, नातेवाईक कलेश, ईश्वरप्पा, निंगप्पा, विश्वनाथ आणि हरिश यांनी मिळून मंजनाथची हत्या केल्याचा आरोप आहे.
advertisement
या घटनेत मंजनाथचे वडील चंद्रप्पा आणि आई अनुसुयम्मा गंभीर जखमी झाले असून त्यांना चित्रदुर्गच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. चित्रदुर्गचे पोलीस अधीक्षक रंजीत कुमार बंडारू यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच याप्रकरणी भरमसागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेपूर्वी रक्षिताच्या आई वडिलांनी तिला एका लग्नासाठी आपल्याजवळ बोलावले होते. पोलिसांच्या उपस्थितीत समझौताही झाला होता.
advertisement
मंजनाथ आधापीसून विवाहित -
यानंतर आता अशीही माहिती समोर आली आहे की, मंजनाथने आधीच एका शीला नावाच्या मुलीवर प्रेम केले होते. तसेच त्यांनी 2019 मध्ये लग्नही केले होते. त्यानंतर तो तिला दावणगेरे येथे घेऊन गेला होता. यानंतर मंजनाथ गायब झाला होता. तसेच त्याने शीलाला सोडून दिले होते. यामुळे मंजनाथच्या या सर्व प्रकाराला कंटाळून शीलाने आत्महत्या केली होती. या प्रकरणात तो आरोपी होता. त्याला 6 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, तो जामिनावर बाहेर आला होता.
advertisement
रक्षिता आणि मंजनाथची प्रेमकहाणी -
रक्षिताने दीड वर्षांनी मंजनाथसोबत प्रेम केले. मात्र, त्याचे चारित्र्य चांगले नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा विरोध केला. मात्र, रक्षिताने कुटुंबीयांचे काहीही न ऐकता त्याच्यासोबत लग्न केले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याची हत्या केली असे सांगितले जात आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
42 वर्षांच्या पुरुषासोबत 19 वर्षांच्या तरुणीनं केलं लव्ह मॅरेज, कुटुंबीयांचा विरोध, घडलं भयानक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement