TRENDING:

Aai Kuthe Kay Karte : चौथ्यांदा आई होणार अरुंधती? आशुतोष सोबत देणार देशमुख कुटूंबियांना मोठी गुड न्यूज

Last Updated:

अरुंधतीला मालिकेत अभिषेक, यश आणि इशा ही तीन मुलं दाखवण्यात आली आहेत. पण आशुतोषचं हे पहिलंच लग्न आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अरुंधतीशी बोलताना बाबा होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता मालिकेत याच विषयाशी निगडित मोठी अपडेट समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 22 नोव्हेंबर :  छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. अरुंधतीची ही गोष्ट प्रेक्षकांना भलतीच आवडते. मालिकेत येणाऱ्या विविध ट्विस्ट आणि टर्न्समुळे प्रेक्षक कथानकाशी खिळवून राहतात. अरुंधतीने आशुतोषशी दुसरं लग्न केलं आहे. तिचा सध्या सुखाचा संसार सुरु आहे. अरुंधतीला मालिकेत अभिषेक, यश आणि इशा ही तीन मुलं दाखवण्यात आली आहेत. पण आशुतोषचं हे पहिलंच लग्न आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अरुंधतीशी बोलताना बाबा होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता मालिकेत याच विषयाशी निगडित मोठी अपडेट समोर आली आहे.
आई कुठे काय करते
आई कुठे काय करते
advertisement

‘आई कुठे काय करते’ मालिकेत काही दिवसांपूर्वी आशुतोषने अरुंधतीशी बोलताना 'मला बाबा व्हायचं आहे अरुंधती' अशी इच्छा बोलून दाखवली होती. मात्र त्याला अरुंधतीने नकार दिला होता. तिने आशुतोषला 'ते शक्य नाहीये. पुन्हा एकदा एक जीव आपल्या आयुष्यात येणार. त्याला मोठं करायचं या सगळ्याला खूप बळ लागतं आणि मला आता नाही वाटतं की आता ते मला माझ्यात उरलं आहे' असं म्हणत नकार दिला होता. त्यावर आशुतोष काहीसा नाराज झाला होता. आता अखेर त्याची इच्छा पूर्ण होणार आहे.

advertisement

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या नव्या भागाची अपडेट समोर आली आहे. समोर आलेल्या प्रोमोत देशमुख कुटुंबीय आनंदानं दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. तेवढ्यात एक मुलगी त्यांच्यासोबत येते. ती कांचनला म्हणते, 'आजी मलाही फटाके वाजवायला दे ना.' त्यावर कांचन अगदी आनंदी होते. ती त्या मुलीला तिचं नाव काय असं विचारते. ती मुलगी त्यावर 'माझं नाव मनस्वी, पण सगळे मला मनु असं म्हणतात.' त्या मुलीच्या उत्तराने सगळेच देशमुख कुटुंबीय आनंदी होतात. पण त्यानंतर कांचन त्या मुलीला तुझे आई-बाबा कोण आहेत' असं विचारते. त्यावर ती मुलगी, 'तिथे येणाऱ्या अरुंधती आणि आशुतोषकडे बोट दाखवते.'

advertisement

ते पाहून सगळे देशमुख कुटुंबीय आनंदीत होतात. आता अरुंधती आणि आशुतोषने मनस्वीला दत्तक घेतलय का, ती मुलगी नक्की कोण हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक झाले आहेत. मालिकेत मनस्वीच्या रूपाने एक नवीन वळण येणार आहे. आता पुढे नक्की काय घडणार, या मुलीला देशमुख कुटुंबीय स्वीकारणार का ते पाहणं महत्वाचं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Aai Kuthe Kay Karte : चौथ्यांदा आई होणार अरुंधती? आशुतोष सोबत देणार देशमुख कुटूंबियांना मोठी गुड न्यूज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल