इंडियन एक्सप्रेसनुसार, "निशानची" ला देशभरात 807 शो मिळाले, ज्यात मुंबईत 158 आणि दिल्ली-एनसीआरमध्ये 192 शो मिळाले. आता मुंबईसह काही ठिकाणी रिलीजच्या तीन दिवसांतच या चित्रपटाचे शो कमी करण्यात येत आहेत. एकीकडे मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही अशी ओरड असताना दुसरीकडे मात्र एका हिंदी चित्रपटाचे शो कमी करण्यात येत आहेत.
Katrina Kaif Pregnancy : कतरिना-विकीच्या घरी 'या' दिवशी पाळणा हलणार; डिलिव्हरी डेट आली समोर
advertisement
बॉक्स ऑफिसवर ठरला फ्लॉप!
ऐश्वर्य ठाकरे अभिनीत 'निशांची' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 25 लाख रुपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 39 लाख रुपये आणि तिसऱ्या दिवशी 21 लाख रुपये कमावले. एकंदरीतच आतापर्यंत रिलीजच्या तीन दिवसांत या चित्रपटाने फक्त 85 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.
'निशांची' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुराग कश्यपने सांभाळली आहे. ऐश्वर्य ठाकरे, वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद जीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. निशांची हा एक क्राईम, ड्रामा असणारा चित्रपट आहे. अजय राय, विपिन अग्निहोत्री आणि रंजन सिंह यांनी जार पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
काय आहे 'निशांची'चं कथानक?
'निशांची' या चित्रपटात कानपूरसारख्या छोट्या शहरात घडणारी एक गोष्ट दाखवण्यात आली आहे. बबलू, डबलू आणि बबलूची खास मैत्रीण वेदिका पिंटो एकत्र चोरी करतात. चोरीच्या वेळी बबलूला पकडले जाते आणि तुरुंगात पाठवले जाते, ज्यामुळे त्याच्या आयुष्यात मोठ्या अडचणी येतात. पुढे कथानकात एक ट्विस्ट येतो डबलू आणि वेदिका प्रेमात पडतात. मग खऱ्या अर्थात प्रेमाचं त्रिकूट, प्रेम आणि सत्यासाठीचा संघर्ष सुरू होतो.