Success Story: तरुणाची कमाल, लोडिंग ऑटोमध्ये सुरू केले नाश्ता सेंटर, महिन्याला 80 हजारांचा नफा, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
पवन बोर्डे हे पाच वर्षांपासून भजी-पावसह विविध खाद्यपदार्थांचे नाश्ता सेंटर चालवतात. त्यांच्या नाश्त्याच्या चवीमुळे खवय्ये दुरून त्यांच्याकडे येतात.
छत्रपती संभाजीनगर : वाळूज येथील प्रताप चौक परिसरात पवन बोर्डे हे पाच वर्षांपासून भजी-पावसह विविध खाद्यपदार्थांचे नाश्ता सेंटर चालवतात. त्यांच्या नाश्त्याच्या चवीमुळे खवय्ये दुरून त्यांच्याकडे येतात, त्यामुळे नेहमी येथे वर्दळ असते. सकाळी 4 वाजल्यापासून हे नाश्ता सेंटर सुरू होते आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ग्राहकांना ते खाद्याची सेवा पुरवतात. बोर्डे यांची दिवसाला 8 ते 9 हजार रुपयांची उलाढाल होत असते, तर महिन्याला खर्च वजा निव्वळ नफा 70 ते 80 हजार रुपये मिळत असल्याचे बोर्डे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
वाळूज येथील एमआयडीसी परिसरातील प्रताप चौकात लोडिंग ऑटो-रिक्षामध्ये किचन बनवून आणि नाश्ता सेंटरसाठी लागणारे सर्व साहित्य या ठिकाणी पाहायला मिळते. या नाश्ता सेंटरमध्ये खिचडी, पोहे, भजी-पाव, समोसे, ब्रेडवडा यासह विविध खाद्यपदार्थ त्यांच्याकडे मिळतात. एमआयडीसी परिसर असल्यामुळे या ठिकाणी नेहमी कामगारांची तसेच रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची नाश्ता करण्यासाठी वर्दळ असते.
advertisement
विशेषतः बोर्डे हे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सर्व मसाले घरी तयार करतात. लसूण अद्रक पेस्ट याबरोबरच लाल मिरच्यांची चटणी यासह विविध मसाले बनवले जातात. या ठिकाणी एक आचारी तसेच दोन कामगार असे एकूण चार जण या ठिकाणी काम करतात आणि रोजगार उपलब्ध झाल्याने ते देखील समाधान व्यक्त करत आहेत. बोर्डे यांच्या नाश्ता सेंटरच्या आर्थिक उलाढालीमुळे आणि प्रगतीमुळे इतर तरुणांना प्रेरणा व मार्गदर्शन मिळत असल्याने ते देखील या व्यवसायात येऊ पाहत आहेत.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
September 22, 2025 3:58 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story: तरुणाची कमाल, लोडिंग ऑटोमध्ये सुरू केले नाश्ता सेंटर, महिन्याला 80 हजारांचा नफा, Video