अनुराग कश्यप यांचे भाऊ अभिनव कश्यप यांनी 'स्क्रीन'ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, सलमान गुंड आहे. उद्धट आणि अत्यंत घाणेरडं असं त्याचं व्यक्तिमत्त्व आहे. अभिनव अजूनही त्याच्या या विधानावर ठाम आहे आणि 'बॉलीवूड ठिकाना'ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की,'दबंग'च्या रिलीजपूर्वी सलमानला आपल्या प्रतिमेत मोठा बदल घडवण्याची गरज होती.
advertisement
Sridevi : 2 वर्ष हॉटेलच्या एकाच रुममध्ये राहिली श्रीदेवी, बाहेरुन यायचं जेवण; प्रसिद्ध शेफचा शॉकिंग खुलासा
'दबंग'आधी सलमान मवाल्यासारखा होता : अभिनव कश्यप
अभिनव कश्यप म्हणाले की, सलमान खानने त्याच्या 'वाँटेड' आणि 'तेरे नाम' या चित्रपटांच्या माध्यमातून एक मवाल्यासारखी प्रतिमा निर्माण केली होती. त्यामुळे 'दबंग'साठी सगळ्यात आधी त्याची ही इमेज ब्रेक करावी लागली. अभिनवच्या मते, 'दबंग'साठी मी सर्वात आधी अरबाज खानसोबत संपर्क साधला होता. अरबाजलाही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारायची होती. पुढे अरबाजने या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं जाहीर केलं. पुढे अरबाज आणि सोहेल खान यांनी अभिनव कश्यप यांना सलमानला भेटवलं. अभिनवला 10 लाख रुपयांची साइनिंग अमाऊंट देण्यात आली आणि सिनेमावर काम सुरू झालं.
सोनाक्षी सिन्हाची मला न विचारता निवड : अभिनव कश्यप
अभिनव कश्यप यांनी सांगितलं की, 'दबंग' चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हाला साइन करण्यात आलं आहे, हे त्यांना मुळीच माहिती नव्हतं. सर्वकाही अंतिम टप्प्यात आल्यानंतर त्यांना याबद्दल सांगण्यात आलं.
अभिनव म्हणाले,"मी चित्रपटासाठी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागीच नव्हतो. मला फक्त इतकंच सांगितलं गेलं की निर्णय घेण्यात आलाय."
'दबंग'च्या दरम्यान अभिनव कश्यप आणि सलमान खान यांच्यातले संबंध इतके बिघडले की दिग्दर्शकाला संपूर्ण फ्रँचायझीतूनच बाहेर काढण्यात आलं. ते ‘दबंग 2’ चा भागही राहिले नाहीत. असं बोललं जाऊ लागलं की अभिनव कश्यप यांनीच ही फिल्म सोडली. याबद्दल बोलताना अभिनव कश्यप म्हणाले की, अनेक लोकांना हे माहीतच नाही की मी ‘दबंग 2’ करत नाही आहे. कोणताही वाद झालेला नव्हता. पण हे लोक उद्धट आहेत, गुंडासारखी प्रवृत्ती आहे. त्यांना खरंतर काम करायचंच नाही, फक्त लोकांवर उपकार करायचे आहेत. त्यांना वाटतं की ते दुसऱ्यांचं आयुष्य घडवत आहेत. मी खोटं बोलू शकत नाही. हे कटू सत्य आहे. मी अनेक वेळा गप्प बसतो, पण जर कुरवाळलंत, तर मग ऐकावं लागेल खरं काय आहे."
सलमान खान सामान्य नाही, गुन्हेगार आहे : अभिनव कश्यप
अभिनव कश्यप यांनी अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत सलमान आणि त्यांच्या कुटुंबावर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "सलमान आणि त्यांचं कुटुंब सामान्य माणसं नाहीत. ते गुन्हेगार आहेत. सलमानला तर कदाचित बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा झाली होती. त्याच दिवशी त्याला जामीनही मिळाला आणि तेव्हापासून कदाचित तो जामिनावरच बाहेर आहे. गुन्हेगार म्हणजे गुन्हेगारच. काही गोष्टी अशा आहेत ज्या मला स्वतःलाही माहिती आहेत."
अभिनव कश्यप सलमान खानला म्हणाले 'गुंड'
एका जुन्या मुलाखतीत अभिनव कश्यप यांनी सलमानबद्दल म्हटलं होतं,"सलमान कधीच प्रत्यक्ष कामात सहभागी होत नाही. त्याला अभिनयात काहीच रस नाही. तो सेटवर येतो आणि फक्त उपकार केल्यासारखं वागतो. त्याला अभिनयापेक्षा सिलेब्रिटी असण्याची ताकद अधिक आवडते. तो एक गुंड आहे. मला ही गोष्ट ‘दबंग’च्या आधी माहित नव्हती. सलमान उद्धट आहे, घाणेरडा माणूस आहे आणि गुंडा आहे."
'दबंग' हा चित्रपट 2010 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. पुढे या चित्रपटाचे दोन सीक्वल आले. पण यावेळी अभिनव कश्यप सहभागी झाले नव्हते.