नुकतंच काल म्हणजे 15 डिसेंबर रोजी अभिनेता शाहरुख खान पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खानसोबत धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात सहभागी झाला होता. शाहरुखचा धाकटा मुलगा अबराम हा या शाळेचा विद्यार्थी आहे. अबराम एका नाटकात सहभागी झाला होता, तेव्हा त्याने या नाटकात थेट आपल्या बाबांचीच कॉपी केली. त्याने हात पसरत शाहरुख खानची आयकॉनिक पोझ देत सगळ्यांचंच लक्ष वेधलं. छोटा अबराम शाहरुखची पोज देताना म्हणाला, 'हग मी, मला मिठी आवडते.' त्याचवेळी बॅकग्राउंडमध्ये 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चं गाणं वाजू लागतं. यावर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या शाहरुख खाननेही प्रतिक्रिया दिली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
शाहरुख खान युनिव्हर्स फॅन क्लब अर्थात ट्विटरच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अबराम स्टेजवर एक नाटक करताना दिसत आहे. तर वडील शाहरुख खान, आई गौरी खान आणि बहीण सुहाना खान त्याला चिअर करताना दिसत आहेत. दरम्यान, अबराम जेव्हा त्याच्या वडिलांची आयकॉनिक पोज देतो तेव्हा शाहरुख खान आनंदाने हात वर करताना दिसतो. आपल्या लेकाला आपलीच पोज देताना पाहून शाहरुखचा ऊर अभिमानानं भरून आला होता. या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. अबरामलाच्या अभिनयाने नेटकरी प्रभावित झाले. तर काही जण त्याची तुलना सुहानाच्या अभियासोबत करत आहेत.
दरम्यान, शाहरुख खानच्या या वर्षातील तिस-या चित्रपट 'डंकी' ची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'डंकी'मध्ये शाहरुख खान सोबत तापसी पन्नू, बोमन इराणी, विक्की कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर हे कलाकार देखील दिसणार आहेत.