बाळ कर्वे यांचं खरं नाव बाळकृष्ण पण सगळे त्यांना बाळ म्हणायचे. पुढे बाळ हेच नाव रूढ झालं. बाळ कर्वे यांचं शिक्षण शिक्षण पुण्यात झालं. ‘कॉलेज ऑफ इंजिनीअिरग पुणे’ येथून ते सिव्हिल इंजिनिअर झाले. 1961 साली पुण्यात पानशेतचं धरण फुटलं. त्यानंतर बाळ कर्वे यांनी मुंबईत धाव घेतली. मुंबई महानगरपालिकेत त्यांनी इंजिनिअर म्हणून त्यांनी 32 वर्ष काम केलं. या काळात ते पार्ल्यात एका नातेवाईकाकडे राहत होते. त्यांच्या इमारतीत सुमंत वरणगांवकर राहायचे. दोघांनी मिळून किलबिल बालरंगमंच ही छोटी संस्था सुरू केली. बाळ यांनी बालपणापासून अभिनयाची आवड होती. मुंबईत काम करत असताना त्यांना दूरदर्शनवरील चिमणराव ही मालिका मिळाली. त्यातील गुंड्याभाऊ हे त्यांचं पात्र प्रचंड लोकप्रिय झालं. पार्ल्याच्या रस्त्यावर कधी फिरत असताना लोक त्यांना गुंड्याभाऊ याचं नावाने हाक मारायचे. पुण्यातून इंजिनिअर होऊन आलेले बाळ कर्वे आता पार्ल्याचे गुंड्याभाऊ झाले होते.
advertisement
विजय मेहता आणि विजया जोगळेकर -धुमाळे या बाळ कर्वे यांच्या गुरू होत्या. लोकमान्य संघाच्या पु.ल.देशपांडे सभागृहातील रंगमंचावरून त्यांनी बालनाट्याच्या रुपातून अभिनयाला सुरूवात केली होती.
इंजिनिअर असल्यामुळे बाळ कर्वे यांना सेट डिझाइनचं कामही कुशलतेनं हाताळता येत होतं. माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिराच्या डागडुजीचे व पुर्नबांधणीचं काम सुरू झालं तेव्हा बाळ कर्वे यांनी नाट्यगृहाची दुरूस्ती आणि फेररचना यात मोलाचं योगदान दिलं होतं. कोणताही आर्थिक मोबदला न घेता त्यांनी काम केलं होतं.
इतकंच नाही तर रंगायनच्या अजब न्याय वर्तुळाचा या नाटकाचा एक प्रयोग जर्मनी येथे होतो. नाटकाच्या प्रयोगाचा सेट विमानातून न्यायचा होता. तेव्हा विमातून नेता येईल अशा घडीचा सेट त्यांनी तयार केला होता.