अदिती राव हैदरीचं सिक्रेट लग्न
अदिती राव हैदरीने 2000 दशकाच्या मध्यात 'दिल्ली-6' आणि 'श्रींगारम'सारख्या चित्रपटांमध्ये छोट्या परंतु महत्त्वपूर्ण भूमिकांसह बॉलिवूडमध्येप्रवेश केला. पण तिच्या पहिल्या काही चित्रपटांनंतर अभिनेत्रीला चांगल्या भूमिकांसाठीकाही वर्षे वाट पाहावी लागली. यादरम्यान तिने अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्न केल्याचीबातमी आली. 2002 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधल्याचा दावा काहीरिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.
advertisement
पण अदितीने 2009 मध्ये एकामुलाखतीत हा दावा फेटाळला आणि 2012 मध्ये तिच्या वैवाहिकजीवनाबद्दल भाष्य करण्यास नकार दिला होता. 2013 मध्येच तिनेउघड केलं होतं की तिने सत्यदीपशी लग्न केलं होतं, पण 2011मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीतअदितीने सांगितलं होतं की, तिने वयाच्या 24 व्या वर्षी लग्न केलं होतं, पण तिने लग्नाचीमाहिती उघड केली नाही कारण ती अभिनेत्री बनण्याचा प्रयत्न करत होती. अदिती वसत्यदीपचा घटस्फोट झाला असला तरी ते चांगले मित्र आहेत.
अदिती राव हैदरीचा राजघराण्यांशी संबंध
अदिती चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्यापूर्वीच एक प्रख्यात पर्सनॅलिटीहोती, कारण तिचा दोन राजघराण्यांशी संबंध होता. अदितीचे वडीलएहसान हैदरी हे हैदराबाद राज्याचे माजी पंतप्रधान अकबर हैदरी यांचे नातू आणिआसामचे माजी राज्यपाल मुहम्मद सालेह अकबर हैदरी यांचे पुतणे होते. तर अदितीची आईविद्या राव या वानपर्थीचे शेवटचे शासक जे रामेश्वर राव यांची कन्या आहेत. चित्रपट निर्मातीव आमीर खानची आधीची पत्नी किरण राव तिच्या आईच्या बाजूने तिची बहीण लागते.
अदिती राव हैदरीची डान्सिंग आणि अभिनय कारकीर्दीची सुरुवात
अदिती एक प्रशिक्षित नृत्यांगना आहे. तिने 2004 च्या सुमारास भरतनाट्यम नृत्यांगना म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीलासुरुवात केली. ती लीला सॅमसन यांच्या ग्रुपशी संबंधित होती आणि ती भारतभर परफॉर्मकरायची. 2010 च्या दशकात 'रॉकस्टार'आणि 'लंडन पॅरिस न्यूयॉर्क'मधील भूमिकांमुळे तिची अभिनय कारकीर्द बहरली. तिने 'मर्डर3' सारख्या हिट चित्रपटात काम केले. ती 'फितूर' आणि 'पद्मावत' सारख्या मोठ्या चित्रपटांमध्येही झळकली. 2023 मध्ये तिनेदोन वेब सीरिज 'ताज: डिव्हाइड बाय ब्लड' व 'ज्युबिली'मध्ये मुख्य भूमिकाकरत OTT पदार्पण केलं.